Maharashtra Assembly Election 2019 : उद्यान व मैदानांच्या विकासाकरिता कटिबद्ध : मोहन मते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:09 AM2019-10-13T01:09:55+5:302019-10-13T01:10:45+5:30
दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपूर परिसरातील सर्व उद्याने अधिक सुशोभित करण्यासाठी आणि आरोग्यविषयक सुविधांसाठी मी सतत प्रयत्न करणार असून या भागातील मैदानाच्या विकासासाठी सुद्धा मी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार मोहन मते केले.
मते यांनी शनिवारी सकाळी प्रभाग क्रमांक ३२ मधून पदयात्रेचा शुभारंभ केला. साई मंदिर, दुर्गा नगर, शिर्के नगर, लाडीकर ले-आऊट, महालक्ष्मी नगर, श्रीनगर, सच्चिदानंदनगर, अंबिकानगर, उदयनगर, जम्मुदीप नगर, जुना सुभेदार, स्वीपर कॉलनी, आदिवासी नगर, खानखोजे नगर या भागातून निघालेल्या जनसंपर्क यात्रेने परिसर दुमदुमला. विविध संघटना तसेच महिला आणि तरुणाईने मोहन मते यांचे स्वागत केले. दक्षिणचा विकास भारतीय जनता पार्टी शिवाय कुणीही करू शकणार नाही, असा विश्वास परिसरातील नागरिक व्यक्त करीत होते. संपर्क यात्रेत शिवसेनेचे नेते शेखर सावरबांधे, नगरसेविका रूपाली ठाकूर, कल्पना कुंभलकर, नगरसेवक अभय गोटेकर, दीपक चौधरी, राजू नागुलवार, मंडळ अध्यक्ष संजय ठाकरे, विलास करांगळे, गजानन तांबोळी, मधु घाटे, प्रभागाचे अध्यक्ष सोमलवार गुरुजी कैलासजी चुटे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. सायंकाळी निघालेल्या संपर्क यात्रेत भवानी मंदिर, विश्वकर्मा नगर, आदिवासी नगर, ताज नगर, बजरंग नगर, जवाहर नगर, जुना सुभेदार, कैलास नगर, तसेच नवीन सुभेदार या भागातील नागरिकांनी मते यांचे ठिकठिकाणी स्वागत केले.