Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक अधिकाऱ्यांच्या 'पोस्टल बॅलेट' मतदानास सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 09:55 PM2019-10-16T21:55:37+5:302019-10-16T22:18:52+5:30

निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला.

Maharashtra Assembly Election 2019: Election Officers 'Postal Ballet' Voting Starts | Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक अधिकाऱ्यांच्या 'पोस्टल बॅलेट' मतदानास सुरुवात

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक अधिकाऱ्यांच्या 'पोस्टल बॅलेट' मतदानास सुरुवात

Next
ठळक मुद्दे१६,५०० कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटसाठी केला अर्ज :२३ तारखेपर्यंत करु शकणार मतदान

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणुकीच्या कामात तैनात असलेले अधिकारी कर्मचारीमतदानापासून वंचित राहू नये म्हणून त्यांच्या पोस्टल मतदानास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. निवडणुकीत तैनात असलेल्यांपैकी १६,५०० च्या वर अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पोस्टल बॅलेटद्वारा मतदान करण्यासाठी अर्ज केला असून त्याद्वारे अनेकांनी तो भरून मतदानाचा हक्क बजावला. उर्वरितांना पोस्टल बॅलेट पोस्टाद्वारे घरपोच पाठविण्यात येणार असून २३ तारखेला दुपारी ३ वाजेपर्यंत तो भरून देता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितल की, निवडणुकीच्या कामात ज्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लागली आहे, त्यांना मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघातील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व्यवस्था करण्यात आली होती. अधिकारी कर्मचाऱ्यांनी या सुविधेचा लाभ मोठ्या प्रमाणावर घेतला. आता जे कर्मचारी पोस्टल बॅलेट भरून देऊ शकले नाही. त्यांना ते पोस्टाने पाठवण्यात येईल. पोस्टल बॅलेट अधिकारी, कर्मचाऱ्यांना वेळेत मिळावे यांसाठी पोस्टाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. पोस्टाकडे वाहनांची कमी असल्याने त्यांना आवश्यक वाहनेही पुरविण्यात येणार आहे. कर्मचाऱ्यांचा पत्ता शोधण्यासाठी अत्याधुनिक प्रणालीचाही उपयोग करण्यात येईल. सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत पोस्टल बॅलेट मिळेल, याची खरबदार घेण्यात येत आहे. शनिवारपर्यंत कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्यांपर्यंत पोस्टल बॅलेट पोहचतील. ते त्यांना २३ तारखेपर्यंत गॅझेटेड ऑफिसरच्या स्वाक्षरीने भरून द्यायचे आहे. त्यामुळे २० तारखेला सुद्धा जेव्हा पोलिंग पार्टी निवडणुकीचे साहित्य घेऊन रवाना होईल, त्या दिवशी सुद्धा त्यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे पोस्टल बॅलेट भरून देण्याची संधी उपलब्ध राहील. थेट पोस्टाने येणारे बॅलेट पेपर मतमोजणीच्या दिवशी २४ तारखेला सकाळपर्यंत स्वीकारले जातील, असेही जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.

‘व्होटर स्लिप’ पोहोचल्या नसतील तर तक्रार करा
मागील निवडणुकीत व्होटर स्लिपचा चांगलाच घोळ झाला होता. त्यामुळे यंदा मतदानाच्या काही दिवस आधीच व्होटर स्लिप मतदारांना देण्याचा मानस असून, आतापर्यंत ७० टक्के मतदारांना व्होटर स्लिप वाटप करण्यात आल्या आहेत. १०० टक्के मतदारांपर्यंत व्होटर स्लिप पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. सर्व मतदारांना घरपोच व्होटर स्लिप मिळेल. दोन दिवसात शंभर टक्के वाटप होईल. यानंतरही कुणाला व्होटर स्लीप मिळाली नाही तर त्यांनी १९५० या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार करावी, असे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Election Officers 'Postal Ballet' Voting Starts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.