Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:01 AM2019-10-13T01:01:13+5:302019-10-13T01:03:01+5:30

सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले.

Maharashtra Assembly Election 2019: I am committed to youth employment: Pramod Manamode | Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे 

Maharashtra Assembly Election 2019 : युवकांच्या रोजगारासाठी मी वचनबद्ध : प्रमोद मानमोडे 

Next
ठळक मुद्देपदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद : आज ‘बाईक रॅली’

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ चंद्रमणी नगरातून काढण्यात आलेल्या पदयात्रेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक क्षेत्रात मी नेहमीच अग्रेसर राहिलो. सरकारच्या रोजगाराच्या योजना कुचकामी ठरल्या असतानाही आपण सात हजार लोकांना रोजगार दिला. रोजगारासाठी नेहमीच तत्पर राहिलो आहे. पुढेही राहणार आहे, असे वचन मानमोडे यांनी पदयात्रेदरम्यान मतदारांना दिले.
चंद्रमणीनगर, कुकडे-लेआऊट, एम्प्रेस मिल्स कॉलनी, शामनगर, स्वराज कॉलनी, जोशीवाडी, जयवंतनगर, त्रिशरण चौक, कुशीनगर, वसंतनगर, नवीन कैलासनगर, श्रमजीवीनगर, विश्वकर्मानगर आणि बाभुळखेडा भागातून पदयात्रेद्वारे मानमोडे यांनी जनसंपर्क साधला. अनेक ठिकाणी मतदारांनी त्यांचे पुष्पहारांनी स्वागत केले. पदयात्रेत मोठ्या प्रमाणात युवा मतदार, महिला व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
यावेळी माजी महापौर पांडुरंग हिवरकर, माजी नगरसेवक अनिल वाघमारे, नत्थूजी मानमोडे, गौरव मानमोडे, शकील पटेल, मंजूर अन्सारी, इसाक मन्सुरी, बापू मानकर, विनायक गवडी, किशोर कावळे, विनोद वाघमारे, सुधाकर बांते, कुमूद शेवाळे, महेंद्रसिंग ठाकूर, विलास गावंडे, योगेश मतलाने, विकास नारायणे, अमित लाखे, अफजल शेख, अनिस लीडर, चित्रा थूल, रुपाली थूल, बेबीनंदा थूल, सविता थूल, वर्षा कुथे, प्रतिभा पाटील, मुन्नी यादव, अमृता वाडे, प्रगती नगराळे, शुभांगी साव, चित्रा वनवे, शोभाताई सोळंके, गोरखनाथ सोळंके, ज्योती कोदे, ताराचंद लोखंडे, शाबाज खान, नरेश नायडू, मनोज फाले, विजय पाटील, प्रमोद गावंडे, देवेंद्र घोरपडे, विठ्ठलराव गावंडे, जरीना खान, रेहाना सय्यद, शबाना शेख, नाजमा शेख, जुनेद शेख, किशोर दिकोंडवार, शाहरुख शेख, रेहान शेख, गगन गजभिये, अर्शद शेख, ज्ञानेश्वर ढेपे, हरीदास गजभिये, बागडताबाई घंगारे, फुलवंताबाई मंडपे, भागीरथाबाई रंगारी, विकास नारायणे आदींसह ५०० वर मानमोडे समर्थक सहभागी झाले होते. रविवारी १३ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. नंदनवन येथील प्रचार कार्यालयातून ही बाईक रॅली निघणार आहे. अधिकाधिक कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी केले आहे.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: I am committed to youth employment: Pramod Manamode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.