Maharashtra Assembly Election 2019 : तुमच्यावरील संकटाचा मी सामना करील : विकास ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 01:20 AM2019-10-13T01:20:28+5:302019-10-13T01:20:51+5:30

आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला.

Maharashtra Assembly Election 2019: I will face the crisis on you: Vikas Thackeray | Maharashtra Assembly Election 2019 : तुमच्यावरील संकटाचा मी सामना करील : विकास ठाकरे

Maharashtra Assembly Election 2019 : तुमच्यावरील संकटाचा मी सामना करील : विकास ठाकरे

Next
ठळक मुद्दे पश्चिम नागपुरात पदयात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : पायाभूत सुविधांचा विकास करणे, नागरी समस्या सोडविणे हे तर लोकप्रतिनिधीचे काम आहेच. मात्र, आपल्यावर येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी आपल्या कुटुंबातील एक सदस्य म्हणून मी सदैव तत्पर राहील, असा शब्द काँग्रेसचे पश्चिम नागपुरातील उमेदवार विकास ठाकरे यांनी दिला.
विकास ठाकरे यांची पश्चिम नागपुरातील बोर नाला, नर्मदा, वृंदावन कॉलनी, वीरचक्र कॉलनी, काकर कॉलनी, स्वामी फाळके लेआऊट, वेलकम सोसायटी, गुलशन सोसायटी, मकरधोकडा, जगदीश नगर, गंगानगर, माता मंदिर, दाभा, गोरेवाडा आदी भागात पदयात्रा झाली. यावेळी ठाकरे म्हणाले, आपण नागपूरचा महापौर म्हणून मी केलेली विकास कामे पाहिली आहेत तर विरोधी पक्ष नेता म्हणून जनतेच्या विविध प्रश्नांवर केलेला संघर्षदेखील पाहिला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी मी कधीही मागे हटलो नाही. कधीही जबाबदारी झटकली नाही. त्यामुळे एकदा माझ्यावर विश्वास करून संधी द्या, असे आवाहन ठाकरे यांनी केले.
पदयात्रेत नगरसेवक हरीश ग्वालबन्सी, नगरसेवक दर्शनी धवड, देवेंद्र रोटेले, दीपक वानखेडे, रोशनी चांदेकर, युगल विधावत, विश्वनाथ देशमुख, आलोक मून, संतोष टेकाम, विशाल मेताम, अशुतोष ग्वालबन्सी, नीलम बनोडे, पुष्पा बवंडेकर, आरीफ खान, आदी उपस्थित होते. विकास ठाकरे यांच्या प्रचारासाठी वृंदा ठाकरे यांनी गोधनी रोड येथे बैठक घेतली. झिंगाबाई टाकळी येथे पदयात्रा केली. यावेळी गजू मोपारी, जगदीश गमे, प्रणाली मानमोडे, रंजना शेंडे, आश सेंदरे, आशा राऊत आदी उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: I will face the crisis on you: Vikas Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.