Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 01:06 AM2019-10-19T01:06:17+5:302019-10-19T01:07:05+5:30

आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.

Maharashtra Assembly Election 2019: Manmodes running for public: Adv. Shrihari An | Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

Maharashtra Assembly Election 2019: मानमोडे जनतेसाठी धावणारे : अ‍ॅड. श्रीहरी अणे

Next
ठळक मुद्देसभा, जनसंपर्क अभियान, बाईक रॅली

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतापर्यंत दक्षिणमध्ये घेणारे अनेक उमेदवार झाले, आता मात्र प्रमोद मानमोडे हे जनतेसाठी धावणारे उमेदवार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ व महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी येथे केले.
नरसाळा रोडवरील टेलिफोन चौक आणि अयोध्यानगर चौकात आयोजित दक्षिण विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांच्या प्रचारार्थ ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमोद मानमोडे, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, अनिल वाघमारे, विनायक गवडी, सत्यंजय त्रिवेदी, किशोर दिकोंडवार, विठ्ठलराव गावंडे, हेमंत मानकर, इसाक मन्सूरी, जागीरभाई, मंजूर अन्सारी, गोरखनाथ सोलके, अब्दुल करीम खान, जाकीर खान, अमोल वनवे, गणेश नाखले, अरुणा वेरुळकर, जरीना खान, ईश्वर भिसे, सूर्यवंशी, राकाँचे प्रवक्ते डॉ. मूर्जी, स्नेहल शिंदे, डबले, विकास नारायणे उपस्थित होते.
अ‍ॅड. श्रीहरी अणे विदर्भ राज्य आघाडीचे समर्थन देताना म्हणाले, सरकारला जनसामान्यांच्या समस्यांशी काहीही घेणे-देणे नाही. सत्तेत आलो तर विदर्भ राज्य देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते. मात्र ते पाळले नाही. आलेल्या पैशांचा उपयोग जनसामान्यांसाठी झाला नाही. सर्व पातळ्यांवर सरकार अपयशी ठरले आहे.
मानमोडे यांच्या प्रचारार्थ शिवनगर, सुदामपुरी, नेहरूनगर, ईश्वरनगर, गुरुदेवनगर, मिरे ले-आऊट, बापूनगर, कबीरनगर, भांडेप्लॉट चौक, दत्तात्रयनगर, न्यू सुभेदार, उदयनगर, जम्बुदीपनगर, साईमंदिर, शारदा चौक, अयोध्यानगर, लाडीकर ले-आऊट, बँक कॉलनी, शारदा चौक, जवाहरनगर, सोमवारी क्वॉर्टर, प्रभूजीनगर, बिडीपेठ भागात बाईक रॅली काढून मतदारांशी संपर्क साधला. मानमोडे यांनी मतदान करण्याचे आवाहन केले.

 

 

 

 

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Manmodes running for public: Adv. Shrihari An

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.