Maharashtra Assembly Election 2019 : जनतेचे फोन टाळणार नाही तर तातडीने दखल घेणार : विकास ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:41 AM2019-10-19T00:41:16+5:302019-10-19T00:42:54+5:30
जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद मिळण्यासाठीच मी ही निवडणूक लढत आहे, असे मत पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एखाद्या नागरिकाने एखाद्या कामासाठी फोन केला तर मी मुंबईला आहे, पक्षाच्या बैठकीत आहे, महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे, असे सांगणाऱ्यांपैकी मी नाही. नागरिकांची समस्या सोडविण्यासाठी सर्व कामे बाजूला सारून मी धावून गेलो आहे. मी जनतेला दूर सारणारा नाही तर जनतेत राहणारा माणूस आहे. जनतेचे प्रश्न सोडविण्याची ताकद मिळण्यासाठीच मी ही निवडणूक लढत आहे, असे मत पश्चिम नागपूरचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.
पश्चिम नागपुरातील अनंतनगर येथे शुक्रवारी आयोजित सभेत बोलताना विकास ठाकरे म्हणाले, नागरिकांचे घरटॅक्स वाढविण्यात आले. पाणी बिलात मोठी वाढ झाली. या विरोधात गेली पाच वर्षे आपण रस्त्यावर उतरून आंदोलन केले आहे. सामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी आपण आवाज उठविल्याचे त्यांनी सांगितले. ठाकरे यांच्या प्रचारासाठी दीपकनगर व नाग विदर्भ हाऊसिंग सोसायटी येथे दिनकर वानखेडे, ताराचंद सोमकुवर, रामू क्षत्रिय, दिलीप घोडीचोर, डी.डी.गजभिये, रमेश इंगोले, शर्मा दाई आदींनी पदयात्रा काढली. गांधीनगरमधून बाईक रॅली काढण्यात आली. राजेश उघडे, भाऊ भालेकर, संजय सरायकर, उमेश पिंपळे, गीता बाजपयी, हरी यादव, महादेव चौधरी, मुकुंद उइके,शत्रुघ्न महतो, अतुल तांबे, जीत कनोजिया, विनोद सगरकर, राजेश रामधम, पंकज बोन्द्रे, अमित वैरागडे आदी सहभागी झाले. टीव्ही टॉवर मानसेवानगर येथील जाहीर सभेत सभेला वृंदा ठाकरे, अॅड. रेखा बाराहाते, नविता चोपकर ,मंदा कोल्हटकर, राजेश रामधम आदी उपस्थित होते.