Maharashtra Assembly Election 2019 : मुख्यमंत्र्यांसाठी पदाधिकाऱ्यांची फौज मैदानात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 10:33 PM2019-10-10T22:33:07+5:302019-10-10T22:33:58+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून काढण्यात आलेल्या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष सहभागी झाले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रातून भाजपच्या तिकिटावर पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्राचारार्थ गुरुवारी सकाळी स्वावलंबीनगर, कामगार कॉलनी तसेच सुभाषनगर भागातून पदयात्रा काढण्यात आली. महापालिकेचे सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या या पदयात्रेत शेकडोच्या संख्येने सामान्य नागरिक, भाजप कार्यकर्ते यासह महिला-पुरुष सहभागी झाले होते.
यानंतर ही पदयात्रा बंडू सोनी ले आऊट, गोपालनगर, संभाजी चौक, शिवाजी चौक, आयटी पार्क परिसर, दत्त मंदिर परिसर, पठाण ले आऊट, लोखंडेनगर या भागातून फिरली. नागरिकांनी जागोजागी या पत्रयात्रेत सहभागी पदाधिकाऱ्यांची आरती ओवाळून त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाची हमी दिली. वयोवृद्ध, भगिनी आणि ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेत आणि नागरिकांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांना निवडून द्यावे असे आवाहन करत ही पदयात्रा नियोजित स्थळी पोहोचली. मुख्यमंत्री स्वत: या पदयात्रेत सहभागी झाले नसले तरी जोशी आणि त्यांच्या भाजप कार्यकर्त्यांनी फडणवीस यांची कमतरता जाणवू दिली नाही.
या पदयात्रेत महापौर नंदा जिचकार यांच्यासह मंडल अध्यक्ष रमेश भंडारी, दिलीप दिवे, सोनाली कडू, प्रमोद तभाने, विनायक चमाटे, कैलाश येसने, योगेश थापे, अनूप वर्मा, जयंत पवार, लक्ष्मण भोले, सुनील गोले, राजू वाघ, प्रवीण पाटील, वर्षा रेकवार, सुवर्णा वानखेड़े, अनिता मानकर, ज्योती नाकतोडे, नरेश शेंडे, शैलेश लायसे, सुनील वासनिक, जीतू कांबळे, नंदा मिलमिले, वर्षा मानकर, प्रभाकर मोहोड, राजेश केवाटे, हरिकृष्ण धनविजय, बबन दियेवार, विवेक मेंढी, उमेश कडू, दानी, अंकित दास, शुभम कनोजिया, श्रेयंश शाहू, निर्मला भापकर, सुशीला भोयर, हिरेन बाळबुधे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.