Maharashtra Assembly Election 2019 : समाजात परिवर्तन करण्याची ताकद  : प्रमोद मानमोडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2019 12:24 AM2019-10-10T00:24:04+5:302019-10-10T00:24:36+5:30

सत्तेत नसतानाही निर्मल परिवाराच्या माध्यमातून हजारोंना रोजगार दिला आहे. अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे. यापुढेही करणार आहे. एका अर्थाने समाजात परिवर्तन करण्याची ताकद माझ्यात असल्याचे प्रतिपादन प्रमोद मानमोडे यांनी येथे केले.

Maharashtra Assembly Election 2019: The Power of Transforming the Community: Pramod Manamode | Maharashtra Assembly Election 2019 : समाजात परिवर्तन करण्याची ताकद  : प्रमोद मानमोडे

Maharashtra Assembly Election 2019 : समाजात परिवर्तन करण्याची ताकद  : प्रमोद मानमोडे

Next
ठळक मुद्दे दक्षिण नागपुरात जनसंपर्क यात्रा

लोकमत  न्यूज  नेटवर्क 
नागपूर : सत्तेत नसतानाही निर्मल परिवाराच्या माध्यमातून हजारोंना रोजगार दिला आहे. अनेक समाजाभिमुख कामे केली आहेत. हे अनेकांनी अनुभवले आहे. यापुढेही करणार आहे. एका अर्थाने समाजात परिवर्तन करण्याची ताकद माझ्यात असल्याचे प्रतिपादन प्रमोद मानमोडे यांनी येथे केले.
दक्षिण नागपुरात जनसंपर्क दौऱ्यादरम्यान त्यांनी नागरिकांशी संवाद साधला. अपक्ष उमेदवार प्रमोद मानमोडे यांनी बुधवारी नंदनवन येथील कार्यालयातून पदयात्रा काढून प्रचाराचा शुभारंभ केला. तत्पूर्वी फित कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केले आणि साईबाबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
नंदनवन सिमेंट रोड, आनंदनगर, ओमनगर, नेहरूनगर, सक्करदरा, गणेशनगर, जुना नंदनवन, शिवनगर, रेशीमबाग, जुनी शुक्रवारी, संगम टॉकीज परिसरात पदयात्रेदरम्यान मानमोडे यांनी नागरिकांना स्वयंस्फूर्तीने मतदान करून सहकार्य करण्याचे आवाहन केले. वाढत्या प्रतिसादामुळे नागरिक माझ्याशी स्वत:हून जुळत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी माजी नगरसेवक अनिल वाघमारे, माजी महापौर पांडुरंग हिवरकर, गोरखनाथ सोळंखे, शकील पटेल, गणेश नाखले, वामनराव भलवतकर, सत्यंजय त्रिवेदी, विलास गावंडे, मौलाना अमीन रिजवी रंगराव गेचोडे, किशोर कावहे, किशोर मांजरे, शुभांगी चिंतलराव, आलम खान, गौरव मानमोडे, प्रसाद मानमोडे, श्रावण मानकर, दिलीप मानकर, केशव बांते, नितीन ठाकरे, नीळकंठ काळे, सारंग शहाणे, अंकुश राऊत, राजू गुडधे, सुधाकर राऊत, मनोज पडोळे, राजेश राऊत, नरेंद्र चौधरी, ज्ञानेश्वर ढेपे, कमलेश मेश्राम आणि युवक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: The Power of Transforming the Community: Pramod Manamode

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.