Maharashtra Assembly Election 2019 : विवेक हाडके यांचा रॅलीद्वारे जनसंपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 11:07 PM2019-10-19T23:07:14+5:302019-10-19T23:07:56+5:30
जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनतेला मूलभूत सुविधा, आरोग्यसेवा, रोजगार निर्मिती या मुद्यांवर भर देत बसपाचे विवेक हाडके यांनी प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महारॅली काढून जनसंपर्क साधला.
या महारॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. विविध घोषणा देऊन कार्यकर्त्यांनी मतदारांना मतदानाचे आवाहन केले. यावेळी बोलताना हाडके म्हणाले, हे क्षेत्र दीक्षाभूमी परिसरात येत असल्याने या मतदार संघाला दीक्षाभूमी विधानसभा मतदार संघाच्या नावाने ओळखले जावे. आपल्या क्षेत्रामध्ये असलेल्या विविध समस्या सोडविण्यासोबतच रोजगार, शिक्षण, आरोग्य यावर विशेष लक्ष देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. मतदार आपल्या पाठीशी राहतील असा, विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या महारॅलीमध्ये उमेदवारासह विवेक पारिल, स्वप्निल बनकर, आकाश पाटील, आदित्य बनकर, प्रशांत पाटील, आदित्य रायपुरे, रोहित चिन्हे, ओपुल तामगाडगे, प्रदीप मून, नितीन हाडके, मेघा हाडके, मंजू ठेंगळे, विजय मांडवे, अजय डांगे, सदानंद जामगडे, सुमन गणवीर, सुधीर कडू, सुनंदा नितनवरे, आदेश रामटेके, नवनीत धडाडे, सागर वराडे, अशोक डोंगरे, रोहिदास भिसे, मनोज राहाटे, अमन पाटील, देवमन पाखीडे आदींसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.