Maharashtra Assembly Election 2019 : झटणाऱ्या नेत्याला साथ द्या : मनीष तिवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2019 11:30 PM2019-10-16T23:30:33+5:302019-10-16T23:30:56+5:30
कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : काँग्रेसने गरीब, वंचित आणि शोषित समाजाच्या हक्कासाठी झटणाऱ्या सामान्य कार्यकर्त्याला पश्चिम नागपूरच्या रिंगणात उतरविले आहे. कोणताही भेदभाव न होऊ देता संपूर्ण विकासाकरिता झटणाऱ्या विकास ठाकरे यांना साथ द्या, असे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी केले.
पश्चिम नागपुरातील गंगानगर चौक, बुधवारी बाजार, फायर कॉलेज जवळच्या मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. तिवारी म्हणाले, विकास ठाकरे यांनी महापौर म्हणून नागपूर शहराचा विकास केला होता, तर विरोधी पक्षनेते म्हणून जनतेच्या प्रश्नांसाठी लढा दिला दिला. धरणे, आंदोलने केली. सत्तेपुढे ते झुकले नाहीत. शरणही गेले नाहीत. जनतेच्या हक्कासाठी लढणाºया नेत्याला आपण साथ देणार नाही का, असा सवाल करीत यावेळी भूलथापांना बळी न पडता काँग्रेसला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. तर विकास ठाकरे यांनी जनतेचा कुठलाही प्रश्न सोडविण्यासाठी मागे हटणार नाही, असे आश्वस्त केले.
यावेळी काँग्रेस नेते विशाल मुत्तेमवार, उमाकांत अग्निहोत्री, हरीश ग्वालबन्सी, दर्शनी धवड, दीपक वानखेडे, युगल विदावत, विश्वनाथ देशमुख, संतोष टेकाम, सुधाकर बोरकर, आशुतोष ग्वालबन्सी, राजवीर यादव, केतन उईके, विशाल किरणाके, भालचंद किरणाके, प्रमोद तडमाके, शीतल तुमडाम, शांताबाई चांदेकर, लता आत्राम, तभाने, नायडू, दुर्गा टेकाम, श्रीराम चांदेकर, प्रकाश सोनुले, आलोक मून, राजू वासनिक, भय्या यादव, पांडे, संतोष शुक्ला, आनंद शुक्ला, बिसेन, भादे, रिझवान रुमवी, राजमणी मिश्रा, विश्वकर्मा आदी उपस्थित होते.