Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:32 AM2019-10-17T00:32:06+5:302019-10-17T00:33:11+5:30

राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.

Maharashtra Assembly Election 2019: Watch on social media campaign | Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच 

Maharashtra Assembly Election 2019 : सोशल मीडियावरील प्रचारावर वॉच 

Next
ठळक मुद्दे५६ उमेदवारांच्या प्रचारासाठी ११७६ लोक सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : निवडणूक प्रचारासाठी आता केवळ चार दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे राजकीय पक्ष व उमेदवारांचा प्रचार जोरात सुरु आहे. राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा, पदयात्रा, कॉर्नर मिटिंगसह सोशल मीडियावर सुद्धा उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. निवडणूक विभागाच्या सायबर सेलची सोशल मीडियावर बारीक नजर आहे.
याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी पत्रपरिषदेत अधिक माहिती देताना सांगितले की, सोशल मीडियावर उमेदवार प्रचार करीत असतात. यात कुठलीही आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल होऊ नये म्हणून सायबर सेलची बारीक नजर आहे. यासाठी सायबर सेलची स्वतंत्र टीम काम करीत आहे. नागपुरातील ५६ उमेदवार सोशल मीडियावर सक्रिय आहे. ते स्वत:च प्रचार करीत आहेत. या उमेदवारांसोबतच ११७६ लोक सुद्धा त्यांचा प्रचार करीत आहे. या सर्वांच्या प्रत्येक पोस्टवर बारीक नजर ठेवली जात आहे. कुणाच्याही व्यक्तिगत किंवा धार्मिक भावना दुखावणार नाहीत, याकडे सायबर सेल नजर ठेवून आहे. कुठलीही आक्षेपार्ह बाब दिसून आली की, लगेच त्याची दखल घेतली जाते. संबंधितांना बोलावून स्पष्टीकरण मागविले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील पोस्टवर नजर ठेवणे मात्र कठीण जात आहे. यावरील पोस्टबाबत एखाद्याने तक्रार केली तरच कारवाई शक्य असल्याचेही जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले.
पत्रपरिषदेला अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके उपस्थित होते.

तीन गुन्हे दाखल
सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याबाबत आतापर्यंत तीन प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही गुन्हे तक्रार केल्यानंतरच दाखल झाले. एक सावनेर, दुसरे नंदनवन आणि तिसरे प्रतापनगर पोलीस ठाणे अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

१७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण
निवडणूक आयोगाने उमेदवारांच्या प्रचाराची प्रत्येक जाहिरात ही प्रमाणित करूनच प्रकाशित व्हावी, यासाठी एमसीएमसी कमिटी गठित केली आहे. या कमिटीने प्रमाणित केल्यावरच उमेदवाराच्या प्रचाराचे साहित्य प्रकाशित केले जाते. आतापर्यंत १७५ उमेदवारांकडून आलेल्या जाहिरातींचे प्रमाणिकरण करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

Web Title: Maharashtra Assembly Election 2019: Watch on social media campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.