शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी, विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक

By मंगेश व्यवहारे | Published: December 8, 2023 12:30 PM2023-12-08T12:30:49+5:302023-12-08T12:31:30+5:30

Maharashtra Assembly Winter Session: अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायथ्याशी शुक्रवारी धरणे देत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

Maharashtra Assembly Winter Session: Gives money to farmers, government takes percentage, opposition party aggressive against state government | शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी, विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक

शेतकऱ्यांच्या हातावर देते तुरी, सरकार घेते टक्केवारी, विरोधी पक्ष राज्य सरकारविरोधात आक्रमक

- मंगेश व्यवहारे
नागपूर  - अवकाळी पावसाने राज्यभरातील शेतकरी हतबल झाला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी सत्तापक्षाला घेरत कापूस, सोयाबीन आणि धानाला भाव मिळावा यासाठी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायथ्याशी शुक्रवारी धरणे देत सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.

आंदोलनात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादार दानवे, अशोक चव्हाण, अनिल देशमुख, नाना पटोले, अभिजित वंजारी, रवींद्र वायकर, सचिन अहिर आदींचा सहभाग होता. यावेळी दानवे म्हणाले,‘कापूस, धान आणि सोयाबीनला भाव मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. सरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकऱ्याच्या मुळावर उठले आहे. दहा हजार कोटींच्या मदतीची घोषणा खोटी आहे. सरकार फक्त आकडेवारी फेकते आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शहरालगतच्या शेतात गेले पण त्यातून काहीही साध्य झालेले नाही. ज्यावेळी जायचे होते तेव्हा ते तेलंगणच्या निवडणुकीत प्रचार करण्यात व्यस्त होते.

आम्ही सभागृहात कापूस, धान, सोयाबीनला भाव मिळावा यासाठी संघर्ष करू. आंदोलनात कापसाच्या माळा घालून आमदारांनी ‘अवकाळी पावसाने शेतकरी त्रस्त, पंचनामे करणारे सरकार सुस्त,’ ‘अवकाळीने निघते शेतकऱ्यांचे दिवाळे, गद्दारांना लागले मंत्रिमंडळ विस्ताराचे डोहाळे,’ ‘शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रुंचा सागर, सरकार देते नुसते गाजर,’ अशा लक्षवेधक घोषणा दिल्यात. 

Web Title: Maharashtra Assembly Winter Session: Gives money to farmers, government takes percentage, opposition party aggressive against state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.