RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 11:55 IST2022-05-18T10:32:05+5:302022-05-18T11:55:18+5:30
Nagpur RSS Reshim Baug : रईस अहमद शेख असादउल्ला शेख याने १५ जुलै २०२१ ला नागपुरातील डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन परिसर तसेच इतर काही महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केल्याची माहिती आहे.

RSS मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी महाराष्ट्र एटीएसच्या ताब्यात
नागपूर : येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालय परिसर आणि स्मृती भवन परिसराची रेकी करणाऱ्या रईस अहमद असादउल्ला शेख या दहशतवाद्याला महाराष्ट्र एटीएसच्या नागपूर युनिटने ताब्यात घेतले आहे.
जैश-ए-मोहम्मदशी संबंधित जम्मू काश्मीर येथील रईस अहमद या दहशतवाद्याने पाकिस्तानातील म्होरक्याच्या आदेशावरून संघ मुख्यालयाची रेकी केली होती. १३ जुलै २०२१ रोजी रेकीसाठी नागपुरात आला होता. रेकी करून तो १५ जुलैला जम्मू काश्मीरला परत गेला. जम्मू-काश्मीरमध्ये स्फोटके पकडल्या गेल्यानंतर रईसने संघ मुख्यालयाची रेकी केल्याचा खुलासा झाला होता. त्यानंतर नागपूर पोलिसात खळबळ उडाली होती.
त्यानंतर कोतवाली पोलिसांनी रईसविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणाचा तपास दहशतवाद विरोधी पथकाकडे सोपविण्यात आला. नुकताच दहशतवाद विरोधी पथकाचे अधिकारी काश्मीरला गेले. तेथून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. एटीएस त्याची कसून चौकशी करीत आहे.