महाराष्ट्र बंदला विदर्भात थंड प्रतिसाद; यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 12:10 PM2018-07-24T12:10:50+5:302018-07-24T12:11:43+5:30
मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भवासियांनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही. यवतमाळ व नागपुरातील काही भागातील अंशत: बंद वगळता सर्वत्र व्यवहार, वाहतूक, शाळा व महाविद्यालये सुरळित सुरू होती.
Next
ठळक मुद्देगडचिरोली, गोंदिया, भंडारा व अमरावतीत सर्व व्यवहार सुरळित सुरू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला विदर्भवासियांनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही. यवतमाळ व नागपुरातील काही भागातील अंशत: बंद वगळता सर्वत्र व्यवहार, वाहतूक, शाळा व महाविद्यालये सुरळित सुरू होती.
नागपुरातील सक्करदरा भागातील बाजारपेठ आज सकाळी बंद करण्यात आली. उर्वरित शहरात सर्व व्यवहार नियमितपणे सुरू आहेत.
मराठी क्रांती मोर्चाकडून आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. गोदावरी नदीत काकासाहेब शिंदे या तरुणाने उडी घेऊन आपला जीव दिला. त्यानंतर, राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत.