Maharashtra Election 2019: मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2019 05:15 PM2019-10-05T17:15:46+5:302019-10-05T17:28:38+5:30
Maharashtra Election 2019: दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार
नागपूर : मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दक्षिण-पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात दाखल केलेल्या उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात डिसेंबर २०१८ च्या नोटरीचा शिक्का वापराला आहे, असा आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी काँग्रेस, आप, व अपक्ष उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाºयांकडे केली आहे. दुपारी ४ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी शेखर घाडगे यांच्याकडे याविषयावरील बंदद्वार सुनावणी सुरू झाली आहे.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आशीष देशमुख, जय जवान जय किसानचे उमेदवार प्रशांत पवार व आम आदमी पार्टीचे उमेदवार अमोल हाडके यांनी तसा आक्षेप नोंदविला आहे. मुख्यमंत्र्यांच्या शपथपत्रावर वापरलेला संबंधित नोटरीचा शिक्का कालबाह्य झाला आहे. त्यामुळे तो ग्राह्य धरता येणार नाही. मुख्यमंत्र्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे निवडणूक विभागाने शुक्रवारी सायंकाळी ६ पर्यंत नोटीस बोर्डावर जाहीर केलेली नव्हती. ती आॅनलाईनही उपलब्ध नव्हती. या संदर्भातही निवडणूक अधिकारी व सदर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. शुक्रवारी आक्षेपानंतर मुख्यमंत्र्यांच्या अर्जासोबत सादर केलेली कागदपत्र सील करण्यात आली. ती पंचांसमक्ष उघडावी, अशी मागणीही आशीष देशमुख व पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. आम आदमी पार्टी, बीएसपी, काँग्रेस व अपक्ष उमेदवार व त्यांचेही प्रतिनिधी सुनावणीत सहभागी झाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हे निवडणूक निर्णय अधिकाºयांवर दबाव टाकत आहेत. राज्यातील निवडणुका पारदर्शीपणे होण्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यातील फडणवीस सरकार बरखास्त करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुनावणी सुरू pic.twitter.com/JqsRHeQzDL
— Lokmat (@MiLOKMAT) October 5, 2019