महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद हा नेहरूंमुळेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2022 10:03 PM2022-11-23T22:03:12+5:302022-11-23T22:04:01+5:30
Nagpur News देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
नागपूर : देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यामुळेच महाराष्ट्र-कर्नाटक राज्यांमधील सीमावाद निर्माण झाला, असा आरोप राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे. बुधवारी ते नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
जवाहरलाल नेहरू यांनी राज्य पुनर्रचना आयोगातून केलेली चूक मराठी माणसाला अजूनही त्रासदायक ठरते आहे. कर्नाटक सीमेवर व राज्यात इच्छा नसताना अनेक गावे गेली. जवाहरलाल नेहरू यांनी सीमावादाचा प्रश्न निर्माण केला. राज्य पुनर्रचना आयोगाने कर्नाटकच्या सीमेत मराठी माणसांना पाठविले होते तेव्हाच त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती. मात्र कॉंग्रेसची सवय कोणताही प्रश्न सोडवायचा नाही अशीच राहिली आहे, असे मुनगंटीवार म्हणाले.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांनी थेट टीका करण्याचे टाळले. मात्र महाराष्ट्राची आर्थिक सुबत्ता व संपन्नता आहे. तसेच मदत करण्यात राज्य आघाडीवर असते. जत गावातील ग्रामपंचायती कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक असतील, तरीही हा प्रश्न सुटणार नाही. मग कर्नाटकमध्ये जी गावे आहेत, ज्यांना महाराष्ट्रात यायचं आहे, त्यांचं काय होणार? मुळात या ४० गावांना महाराष्ट्र सरकारएवढी मदत आजपर्यंत कोणीही केली नाही. त्यामुळे अशी कारणे सांगून ते ठराव करत असतील तर आश्चर्यकारक बाब आहे, असे ते म्हणाले.