Maharashtra Lockdown: राज्यात पुन्हा कडक निर्बंध लागणार का? मंत्री वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2021 04:13 PM2021-09-07T16:13:05+5:302021-09-07T16:13:35+5:30
Maharashtra Lockdown: राज्यात तिसऱ्या लाटेनं धडक दिली असून कडक निर्बंध लादले जाणार असल्याच्या चर्चेवर मंत्री वडेट्टीवार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Maharashtra Lockdown: राज्यात आता निर्बंध लागले तर संपूर्ण महाराष्ट्रात लागतील, असं विधान मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. नागपूरात रुग्णसंख्या वाढत असल्यानं त्याठिकाणी निर्बंध घोषीत केले जाण्याबाबच्या प्रश्नावर ते बोलत होते. विजय वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. त्यात राज्यातील लॉकडाऊन संपर्भात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलं आहे.
"नागपूरसह महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्याची सध्या चर्चा नाही. राज्यात निर्बंध लावले जातील अशी पुढील काही दिवसांसाठी शक्यता दिसत नाही. तिसरी लाट येणार हे अटळ आहे. सध्या तिसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे. निर्बंध लावण्यासंदर्भातील निर्णय मुख्यमंत्री घेतात. मात्र अद्याप तरी राज्यात निर्बंध कडक करणार असं सुतोवाच नाही", असं वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.
नागपूरमध्ये तिसरी लाट धडकली असून निर्बंध लावले जातील अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली होती. त्याबाबत विचारण्यात आलं असता नितीन राऊत यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली असावी. याबाबत माहित नाहीत. माहिती घेऊन मी सांगेन. पण निर्बंध लावायचे की नाही हे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. निर्बंध लागले तर संपूर्ण राज्यासाठी लागतील, असंही वडेट्टीवार म्हणाले.
पडळकरांना प्रत्युत्तर
राज्यातील तीन पक्षांचं सरकार जास्त दिवस चालणार नाही अशी अनेकांची बावना होती. पण हे तीन पक्षांचं सरकार फेविकॉलप्रमाणे घट्ट झालंय. तुटेगा पर छुटेगा नही, असं वडेट्टीवार म्हणाले. पडळकरांवर टीका करताना वडेट्टीवार यांनी पडळकर तर दीड वर्ष कोठडीत होते. त्यांच्या तोंडी काय लागायचं. त्यांनी विरोबाची शपथ घेऊन सांगितलं होतं की भाजपात जाणार नाही, आता ते कुठे आहेत?, असा टोला त्यांनी लगावला.