नागपुरात मतदानाला उत्साहात सुरुवात, सरसंघचालकांनी केले मतदान, शतप्रतिशत मतदानाचे आवाहन
By योगेश पांडे | Published: April 19, 2024 07:48 AM2024-04-19T07:48:42+5:302024-04-19T07:50:31+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केले.
- योगेश पांडे
नागपूर - नागपूर लोकसभा मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून अनेक मतदान केंद्रांवर नागरिकांचा उत्साह दिसून येत आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी सकाळी सव्वा सात वाजताच मतदान केले. महाल येथील भाऊजी दफ्तरी शाळेतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केले. सरसंघचालक सकाळी सात वाजताच मतदान केंद्रावर पोहोचले. त्यांच्यासमवेत नागपूर महानगर संघचालक राजेश लोया हेदेखील होते.
दर निवडणूकीत सरसंघचालक सर्वात अगोदर मतदानकेंद्रावर पोहोचतात व यावर्षीदेखील ही परंपरा त्यांनी कायम ठेवली. बाहेर आल्यावर त्यांनी नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन केले. मतदान आपला अधिकार व कर्तव्य आहे. १०० टक्के मतदान झाले पाहिजे व त्यासाठीच मी आज सर्वात अगोदर मतदानाचेच कर्तव्य पार पाडले, असे प्रतिपादन सरसंघचालकांनी यावेळी केले. शतप्रतिशत मतदानासाठी संघाने मोहीम राबविली होती हे विशेष.