श्रीराम सोनवणे यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 22:08 IST2019-12-16T22:07:38+5:302019-12-16T22:08:47+5:30
‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

श्रीराम सोनवणे यांना महाराष्ट्र विज्ञान अकादमीचा पुरस्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘व्हीएनआयटी’चे असोसिएट प्रोफेसर डॉ. श्रीराम सोनवणे यांना शिक्षणक्षेत्रातील कार्याबद्दल महाराष्ट्र विज्ञान अकादमीतर्फे ‘फेलो’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुण्यातील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान व बायोटेक्नॉलॉजी संस्थेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ.सोनवणे यांना अभियांत्रिकी संशोधन आणि विकास, अध्यापन, नियोजन व प्रशासन, आंतरराष्ट्रीय सहकार्य इत्यादी विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
सद्यस्थिती डॉ. श्रीराम सोनवणे हे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागासह भारत-ट्युनिशिया, भारत-ऑस्ट्रेलिया, भारत-मलेशिया आणि भारत-रशिया अशा अनेक प्रकल्पांवर काम करत आहेत. उद्योगासमोरील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी उद्योगांना सहकार्य करण्याचा त्यांनी नेहमी प्रयत्न असतो. १४ डिसेंबर रोजी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या त्यांच्या उत्कृष्ट योगदानाबद्दल मुंबई विद्यापीठाच्या रसायन तंत्रज्ञान संस्थेचे कुलगुरू प्रा.गणपती यादव व ‘एमएएस’चे सचिव डॉ.भारत काळे यांच्या हस्ते त्यांना गौरविण्यात आले.