महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे शुक्रवारी शाळा बंद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2018 11:26 PM2018-11-01T23:26:41+5:302018-11-01T23:29:14+5:30

खाजगी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळा, शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर शाळा बंद ठेवण्यात येणार आहे.

Maharashtra State Educational Institution Corporation today closed the school agitation | महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे शुक्रवारी शाळा बंद आंदोलन

महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे शुक्रवारी शाळा बंद आंदोलन

Next
ठळक मुद्दे१०० टक्के अनुदानाची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खाजगी शिक्षण संस्थाद्वारा संचालित शाळा, शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शुक्रवारी संपूर्ण दिवसभर शाळा बंद ठेवण्यात येणार आहे. शिक्षण क्षेत्रातील विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बैठक घ्यावी, शिक्षणावर खर्च वाढवावा, २० टक्के अनुदानित शिक्षकांना प्रचलित नियमानुसार १०० टक्के अनुदान द्यावे, अघोषित शाळा, वर्ग-तुकड्यांना तात्काळ निधीसह अनुदान घोषित करावे, यासह अन्य मागण्या आंदोलकांच्या आहे. गुरुवारी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने आरटीईच्या प्रतिपूर्ती मिळण्यासाठी शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन दिले. २०१२ ते १५ या सत्रात आरटीईची प्रतिपूर्ती ५० टक्के पेक्षा कमी मिळाली. २०१५-१६ व २०१६-१७ ची आरटीई प्रतिपूर्ती रक्कम काही शाळांना कमी काहींना जास्त मिळाली. २०१७-१८ ची प्रतिपूर्ती अद्यापही मिळाली नाही. ती लवकरात लवकर देण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे कपिल उमाळे, मोहम्मद आबीद, स्वाती उपगन्लावार यांनी केली. संघटनेनेसुद्धा बंदला पाठिंबा दिला आहे.

Web Title: Maharashtra State Educational Institution Corporation today closed the school agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.