Vidhan Sabha 2019 : आकड्यांचा घोळ...जुळून येईल का मेळ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 02:53 PM2019-09-22T14:53:39+5:302019-09-22T14:55:09+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन्
-बालाजी देवर्जनकर
(आचारसंहिता लागली...आता उमेदवारी घोषित होईल. भाजप-सेनेत अन् काँग्रेस-राष्ट्रवादीत युती-आघाडीचे घोडे अडलेले असेल. इकडे हे सुरू असेल अन् आमचे कार्यकर्ते टीव्हीसमोर असतील. इथून (उमेदवारी मिळेपर्यंत) टीव्हीवरचा संवाद असा चवीने चर्चिला जाईल)
चॅनेलवरील अँकर...‘युती आणि आघाडी’चे काय होणार? आजच्या चर्चेत सहभागी आहेत..पाटील साहेब, कदम साहेब, जाधव साहेब आणि पवार साहेब. चला चर्चेला सविस्तर सुरुवात करूया...पवार साहेब तुमच्यापासून...काय सांगाल. आघाडी होईल ना! जाधव साहेब तुम्ही सांगा...युतीचं कुठवर आलंय. जुळून आलंय की स्वतंत्र लढताय. अँकर...जाधव साहेब तुम्ही सांगा...काय घोळ सुरू आहे , तुमच्या युतीत. ठरतेय...आमचं सगळं ठरलंय..जुळून आलं तरी (मनात बिघडलं तरी) निवडणुकीच्या तोंडावरच असे का परिस्थिती येते...(कार्यकर्ते तोडगा निघेल की नाही या चिंतेत)
अॅँकरचा प्रश्न आघाडीच्या पवार साहेबांना...तुम्ही तर लोक सभेत एकत्र लढलात. (अपक्ष नेते कदम साहेब मध्येच चर्चेत गुगली टाकतात..आमचीच मदत लागेल यांना..यांचे आमदार, नेते पाहा...चाललेत दोन्हीकडे. कसली निष्ठा हो. काही राहिले नाही आता ते. घराणेशाही संपली आता. (जाधव साहेब...आता नवीन निवडून येतील ते बहुतांश आमचेच असतील)
अँकर पुन्हा...लोकसभेला आघाडीला मोठे अपयश आलं. तुमचंच हे अपयश म्हणावे का? जाधव साहेबांचं उत्तर..हे बघा आमचा अनेक वर्षांपासूनचा संसार आहे. आता वय वाढल्यावर काहीतरी फरक पडतोच बोलण्यात. भांड्याला भांडं लागतंच. तसंच आघाडीचं आहे. तेच युतीत चालतं.
विश्लेषकांकडे प्रश्न जातो...तुम्ही सांगा कोलते सर काय सुरू आहे... काय सांगाल तुम्ही या परिस्थितीवर. परिस्थिती तुम्ही म्हणताय तशी यावेळेला टोकाला गेलेली नाही. भांडतील...पुन्हा ताळ्यावर येतील. कारण आघाडी अन् युती दोघांनाही ठाऊक आहे...आपली धाव कुठवर...वाट पाहा. जागावाटपासाठी हे सर्व चालेलच. मागच्या वेळेलाही अशीच भांडणं झाली यांच्यात. राजकारण आहे...चालायचच हे. अँकर...आता वेळ संपलेली आहे. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी बैठक लवकरच होईल. हायक मांडचाही फ तवा निघेल. बघूया...कुणाला कि ती जागा मिळतात. चला तर भेटूया...(आजपासून निकाल लागेपर्यंत)