Maharashtra Winter Session 2022: 'गद्दारीचे पाप, महाराष्ट्राला ताप'; '५० खोके'सोबत विरोधकांच्या नव्या घोषणा, नागपूरचे विधानभवन दणाणले

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:44 AM2022-12-19T10:44:19+5:302022-12-19T11:03:39+5:30

कर्नाटक सरकार हाय हाय.. ईडी सरकारचा धिक्कार असे; विरोधीकांनी पहिल्याच दिवशी दणाणून सोडला परिसर

Maharashtra Winter Session 2022: Opposition sloganeering on first day of winter session | Maharashtra Winter Session 2022: 'गद्दारीचे पाप, महाराष्ट्राला ताप'; '५० खोके'सोबत विरोधकांच्या नव्या घोषणा, नागपूरचे विधानभवन दणाणले

Maharashtra Winter Session 2022: 'गद्दारीचे पाप, महाराष्ट्राला ताप'; '५० खोके'सोबत विरोधकांच्या नव्या घोषणा, नागपूरचे विधानभवन दणाणले

googlenewsNext

नागपूर - विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाने कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, विदर्भाला न्याय मिळालाच पाहिजे, महाराष्ट्र द्रोहाला संरक्षण देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन विधानभवन परिसर दणाणून सोडला. 

या आंदोलनात विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, धनंजय मुंडे यांच्यासह विरोधी पक्षाचे, महाआघा़डीचे सर्व आमदार आंदोलनात सहभागी झाले. ५० खोके एकदम ओके असे बॅनर विरोधी पक्षाच्या आमदारांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कर्नाटक सरकार हाय हाय, ईडी सरकार हायहाय अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, आदिती तटकरे, अशोक चव्हाण राजेश टोपे, एकनाथ खडसे, अंबादास दानवे, नाना पटोले यांसह इतर आमदार उपस्थित होते.

Web Title: Maharashtra Winter Session 2022: Opposition sloganeering on first day of winter session

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.