ZP Election 2020; नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2020 01:16 PM2020-01-08T13:16:20+5:302020-01-08T13:18:13+5:30

नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे.

maharashtra zp Election 2020; BJP hit big in Nagpur district | ZP Election 2020; नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे

ZP Election 2020; नागपूर जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का; कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सत्तेकडे

Next
ठळक मुद्देशिवसेनेने अद्याप खाते उघडले नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे. जिल्ह्यातील ५८ जि.प.सर्कल पैकी २८ सर्कलचे निकाल जाहीर झाले आहेत. यात २३ जागावर कॉँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीने विजय मिळविला आहे. यात कॉँग्रेसने १९ तर राष्ट्रवादीने चार जागावर विजय मिळविला आहे. भाजप चार जागावर विजयी झाली आहे तर एका जागेवर शेकापला विजय मिळाला आहे.
नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली आहे. यात कॉँग्रेसने ४२ तर राष्ट्रवादीने १६ जागेवर निवडणूक लढविली होती.

आजी-माजी मंत्री पुत्र जिंकले
नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील मंटपांजरा सर्कलमध्ये राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र राष्ट्रवादीचे सलील देशमुख तर हिंगणा तालुक्यातील रायपूर सर्कलमध्ये माजी मंत्री रमेश बंग यांचे पुत्र राष्ट्रवादीचे दिनेश बंग विजयी झाले आहे.

बावनकुळेंना तिकीट नाकारले पुन्हा भोवले
अलीकडेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तिकीट कापले होते. बावनकुळेंचे तिकीट कापल्याचा मोठा फटका विधानसभा निवडणुकीत भाजपला बसला होता. आता जिल्हा परिषद निवडणुकीत तो मोठ्या प्रमाणात बसताना दिसतो आहे.

 

Web Title: maharashtra zp Election 2020; BJP hit big in Nagpur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.