उत्तरेकडच्या पाऊस, बर्फवृष्टीने वाढेल महाराष्ट्राची थंडी; विदर्भ गारठणार

By निशांत वानखेडे | Published: January 29, 2024 07:12 PM2024-01-29T19:12:15+5:302024-01-29T19:12:53+5:30

विदर्भात दिवसरात्रीचा पारा सरासरीत : फेब्रुवारीचा पहिला आठवडा गारव्याचा

Maharashtra's cold will increase due to rain, snowfall in the north | उत्तरेकडच्या पाऊस, बर्फवृष्टीने वाढेल महाराष्ट्राची थंडी; विदर्भ गारठणार

उत्तरेकडच्या पाऊस, बर्फवृष्टीने वाढेल महाराष्ट्राची थंडी; विदर्भ गारठणार

नागपूर : लागोपाठ येणाऱ्या तीन पश्चिमी झंजावाताच्या साखळीतून संपूर्ण उत्तर भारतात सध्या असलेल्या धुके व बर्फवृष्टीबरोबरच पावसाची शक्यताही निर्माण झाली. या प्रभावाने विदर्भासह महाराष्ट्रात ४ फेब्रुवारीपर्यंत थंडी वाढण्याची शक्यता आहे. विदर्भातही दिवसरात्रीचे तापमान सरासरीत किंवा खाली राहण्याचा अंदाज आहे.

२५ जानेवारीला ८.७ अंशावर गेल्यानंतर तापमान पुन्हा वाढायला लागले. थंड हवेची दिशा बदलल्याने पारा वाढत आहे. नागपुरात साेमवारी किमान तापमानात १.२ अंशाची वाढ हाेत १२.८ अंशावर पाेहचले. दिवसाचे  तापमानही अंशत: वाढत ३०.४ अंशावर गेले आहे. गाेंदिया वगळता संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ३० अंशाच्या वर आहे. येथे रात्रीचा पारा सर्वात कमी ११.६ अंश नाेंदविण्यात आला आहे. विदर्भात मात्र पहाटेचे किमान तापमान हे १२ अंश म्हणजे सरासरी इतके, तर दुपारचे कमाल तापमान २८ ते ३० अंश सरासरी इतकेचे राहण्याचा अंदाज आहे.

Web Title: Maharashtra's cold will increase due to rain, snowfall in the north

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.