‘महाशक्ती’२८८ जागांवर लढणार; राजू शेट्टी व कडू पाहणार ग्राउंडवरील काम
By कमलेश वानखेडे | Published: September 25, 2024 05:45 PM2024-09-25T17:45:05+5:302024-09-25T17:48:54+5:30
बच्चू कडू : छत्रपती संभाजीनगरच्या बैठकीनंतर जागावाटप
नागपूर : आमची महाशक्ती आहे. महायुती किंवा महाविकास आघाडी नाही. आगामी विधानसभा निवडणुकीत महाशक्ती म्हणून समोर जाणार व सर्व २८८ जागांवर लढणार. छत्रपती संभाजीनगर येथील बैठक झाल्यावर जागावाटपाची रचना करणार, असे प्रहारचे नेते आ. बच्चू कडू यांनी सांगितले.
नागपुरात बुधवारी पत्रकारांशी बोलताना आ. कडू म्हणाले, महाशक्तीचे जागावाटप कसे होईल ते पाहू. राजू शेट्टी व मी ग्राउंडवरील काम पाहणार आहोत. अमित शाह यांनी विदर्भातील ४५ जागा जिंकण्याचा निर्धार केला. त्यांनी लोकसभेतही असाच निर्धार केला होता. पण हा गुजरात नाही महाराष्ट्र आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. संजय राऊत हे शिवसेनेचे आकाशवाणी केंद्र आहे त्यामुळे ते रोज बोलत असतात. कुठल्याही मंत्र्याचा महाराष्ट्रात वचक नाही. चारित्र्याचा दाखला मिळवण्यासाठी पोलिस १०० रुपयेसुद्धा घेतात, अशी टीका त्यांनी केली.
एन्काउंटरची कल्पना नाही
अक्षय शिंदेवरून टीका होत आहे. तो एन्काउंटर कधी झाला, मला त्याची कल्पना नाही. आम्ही गावाकडे शेती करत असतो, टीव्ही पाहत नाही, असेही बच्चू कडू म्हणाले.