महाठग रजनिश सिंग गजाआड

By Admin | Published: March 24, 2017 04:18 PM2017-03-24T16:18:50+5:302017-03-24T16:18:50+5:30

विविध बँकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग रजनिश अयोध्याप्रसाद सिंग याच्या अखेर शुक्रवारी सकाळी गुन्हेशाखेच्या (ईओडब्ल्यू ) पथकाने मुसक्या बांधल्या.

Mahatgag Rajan Singh Sing Gajaad | महाठग रजनिश सिंग गजाआड

महाठग रजनिश सिंग गजाआड

googlenewsNext

कोटयवधींची फसवणूक : विविध बँकांना गंडा : पत्नीनेच केली तक्रार
नागपूर : विविध बँकांना कोट्यवधींचा गंडा घालणारा महाठग रजनिश अयोध्याप्रसाद सिंग याच्या अखेर शुक्रवारी सकाळी गुन्हेशाखेच्या (ईओडब्ल्यू ) पथकाने मुसक्या बांधल्या. ठगबाज रजनिशचे वडील अयोध्याप्रसाद सिंग हे आयुध निर्माणीचे (आॅर्डनन्स फॅक्टरी) निवृत्त महाव्यवस्थापक आहे. रजनिशची पत्नी सुनीता यांनी केलेल्या तक्रारीनंतरच या महाठगाच्या बनवाबनवीचे किस्से चर्चेला आले, हे विशेष !
महाठग रजनिश हा बनावट कागदपत्रे तयार करतो आणि त्या आधारे बँकांमध्ये कर्ज प्रकरण सादर करतो. बँक अधिका-यांशी जवळीक साधून कर्ज प्रकरणे मंजूर करवून घेतो आणि त्याआधारे लाखोंचे कर्ज उचलून नंतर बेपत्ता होतो. त्याने अशा प्रकारे बँक आॅफ इंडिया, आयसीआयसीआय, युनियन बँक, चोलामंडलमसह अनेक खासगी वित्तीय संस्थेतून कोट्यवधींचे कर्ज उचलले आहे. कर्जाचे हप्ते थकित झाल्यानंतर बँक अधिका-यांकडून चौकशी सुरू होते आणि नंतर ठगबाज रजनिशची बनवाबनवी उघड होते. मात्र, सारखे मोबाईल क्रमांक आणि पत्ता बदलवत असल्याने तो कुणाच्या हाती लागत नव्हता. मात्र, त्याची पत्नी सुनीता सिंग यांनीच त्याच्या ठगबाजीचा बुरखा फाडून त्याला कोठडीत पोहचविले.
पत्नीलाही फसविले
२०१६ मध्ये त्याने पत्नीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करून उचलल्याचे आणि कर्जाची रक्कम थकल्याने बँक अधिका-यांनी त्याच्या पत्नी सुनीता यांच्याशी संपर्क साधल्याने सुनीता यांनी तडक सदर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्याचवेळी त्यांनी स्थानिक वरिष्ठ पोलीस अधिका-यांची भेट घेऊन त्यांना ठगबाज रजनिशकडून होणारा त्रास सांगितला. त्यामुळे या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. दरम्यान, ठगबाज रजनिशने अनेक बँका आणि व्यक्तींची फसवणूक केल्याचे उघड होताच गुन्हे शाखेतील आर्थिक सेलच्या पोलीस पथकाने त्याच्या मुसक्या बांधण्यासाठी धावपळ सुरू केली.
--
पोलीस बरमुडा आणि टी शर्टवर
गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी रजनिशने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. १६ फेब्रुवारीला कोर्टाने त्याचा जामिनअर्ज फेटाळला. त्यानंतर तो फरार झाला आणि त्याने वकिलाच्या माध्यमातून अटकपुर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्याच्या जामिनअर्जावर आज शुक्रवारी निर्णय घेतला जाणार होता. मात्र, ईकडे त्याचा पोलीस शोध घेतच होती. तो त्रिमुर्तीनगरातील (हर्षविला, जलविहार कॉलनी) त्याच्या वडिलांच्या घरी आल्याचे कळताच पोलीस उपायुक्त ईशू सिंधू यांच्या मार्गदर्शनाखाली ईओडब्ल्यूचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजिर शेख यांच्या नेतृत्वात नायक प्रशांत किंदर्ले, दिनेश तांदुळकर यांचे पोलीस पथक अयोध्याप्रसाद सिंग यांच्या निवासस्थानी शुक्रवारी सकाळी ७ वाजता पोहचले. आरोपीने ओळखू नये म्हणून पोलीस पथक चक्क बरमुडा आणि टी शर्टवर (सकाळी फिरायला जातो, तशा पेहरावात) सिंगच्या घरी गेले. त्यांनी रजनिशला तेथून ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेत आणले. वृत्त लिहिस्तोवर त्याला कोर्टात नेण्याची तयारी सुरू होती.

Web Title: Mahatgag Rajan Singh Sing Gajaad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.