संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 11:13 AM2022-12-28T11:13:24+5:302022-12-28T11:15:24+5:30

विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी

Mahavikas aghadi agitation against shinde-fadnavis govt | संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर

संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ; सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधकांचा आक्रमक सूर

googlenewsNext

नागपूर : दिल मांगे मोर, सत्ताधारी चोर.. नागपूरची संत्री भ्रष्टाचारी मंत्री, राजीनामा द्या राजीनामा द्या अब्दुल सत्तार राजीनामा द्या अशा घोषणांनी विरोधकांनी विभान भवन परिसरात निदर्शनं केली. हातात संत्री घेऊन जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांनी आजही आंदोलनाचा तीव्र सूर आवळला.

विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही विरोधकांचा आक्रमक सूर कायम आहे. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधान भवन पायऱ्यांवर प्रदर्शन केले. यावेळी शेतकरी उपाशी, मंत्री आहे तुपाशी, खोके येऊ द्या येऊ द्या, उद्योग जाऊ द्या-जाऊ द्या.. सह संत्री आहेत गोल, सरकारचे मंत्री आहेत झोल, संत्री आहेत गोड, भूखंड खाण्यासाठी चढाओढ, धानाला बोनस मिळालाच पाहिजे अशा घोषणांनी विरोधकांनी विधान भवन परिसर दणाणून सोडला.

यावेळी विधान सभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, छगन भुजबळ, रोहित पवार, सुनील केदार, विकास ठाकरे, किरण लहामटे, भास्कर जाधव आदि उपस्थित होते.

Web Title: Mahavikas aghadi agitation against shinde-fadnavis govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.