महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2019 10:22 AM2019-11-02T10:22:03+5:302019-11-02T10:23:16+5:30

वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.

MahaVitaran says please join us! | महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

महावितरण म्हणते प्लीज ११ ला जॉईन व्हा!

googlenewsNext
ठळक मुद्दे२०१४ ची भरती प्रक्रिया ४६९ उमेदवारांचा नोकरी देण्यासाठी शोध सुरू

कमल शर्मा।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मथळा वाचून आश्चर्य वाटले असेल, परंतु हे खरे आहे. वीज वितरण कंपनी महावितरण, २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या ४६९ उमेदवारांचा शोध घेत आहे. कारण या सर्व उमेदवारांना ११ नोव्हेंबर रोजी नियुक्तीच्या जागी जॉईन करून घ्यायचे आहे.
आता स्वाभाविकपणे प्रश्न निर्माण होतो कीअखेर असे काय झाले. सरकारी नोकरीसाठी लोक काय काय करीत नाही. परंतु येथे स्वत: प्रशासन उमेदवारांना जॉईन करून घेण्यासाठी धावपळ करीत आहे. या उमेदवारांमध्ये असे काय विशेष दडले आहे. चला खरा प्रकार काय ते जाणून घेऊ या.
हे सर्व उमेदवार २०१४ मध्ये महावितरणच्या भरती प्रक्रियेत यशस्वी होऊन विद्युत सहायक बनण्यासाठी पात्र ठरले होते. सामाजिक आणि आर्थिक दृष्टीने मागास (ईएसबीसी)च्या नावावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची सुरुवात याच भरती प्रक्रियेच्या माध्यमातून सुरू झाली होती.
परंतु ही प्रक्रिया सुरुवातीपासूनच न्यायालयीन अडचणीत फसली आहे. अगोदर याचिका दाखल करून भरतीसाठी दहावी व आयटीआयमधील गुणांना आधार बनवण्याची मागणी करण्यात आली. न्यायालयाच्या निर्णयावर याला आधार बनवून पुन्हा अर्ज मागवण्यात आले. यादरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यावरून राजकारण तापले. मोर्चे निघायला सुरुवात झाली.
निवड झालेल्या ४६९ उमेदवारांची यादी सुद्धा जारी करण्यात आली. परंतु ते जॉईन करण्यापूर्वीच प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. अखेर सरकारने ईएसबीसीला एसईबीसी (विशेष दर्जा) दिला. सर्वोच्च न्यायालयानेही हिरवी झेंडी दाखवली. जुलैमध्ये आरक्षणाबाबत जी.आर. सुद्धा जरी झाला. यासोबतच २०१४ च्या भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांना जॉईन करण्यास सुरुवात करण्यात आली. या उमेदवारांना ३ नोव्हेंबरपर्यंत आपले दस्तावेज महावितरणच्या वेबसाईटवर अपलोड करावयाचे आहे. ११ नोव्हेंबर रोजी त्यांना नियुक्तीच्या जागेवर पोहोचून जॉईन सुद्धा व्हायचे आहे. परंतु समस्या इथेच निर्माण झाली आहे. बहुतांश उमेदवारांशी संपर्क होत नाही आहे. महावितरणच्या वेबसाईटवर आतापर्यंत नाममात्र उमेदवारांनीच आपले दस्तावेज अपलोड केले आहेत. कंपनीचे अधिकारी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मोबाईल नंबर बंद, मेलसुद्धा होताहेत बाऊन्स
महावितरणने या उमेदवारांपर्यंत पोहोचण्यासाठी २०१४ मध्ये केलेल्या अर्जासोबत दिलेले मोबाईल क्रमांक आणि ई-मेल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु बहुतांश उमेदवारांचे मोबाईल क्रमांक बंद आहेत किंवा ते दुसऱ्याकडे आहेत. त्याचप्रकारे ई-मेल सुद्धा बाऊन्स होत आहेत. तसेही पाच वर्षापर्यंत महावितरणच्या नोकरीची प्रतीक्षा करीत कोणता उमेदवार रिकामा असेल. दहावीनंतर आयटीआय करणाºया त्या उमेदवारांपर्यंत पोहोचणे आता चांगलेच कठीण होऊन बसले आहे.

Web Title: MahaVitaran says please join us!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.