महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय

By आनंद डेकाटे | Published: July 14, 2024 07:07 PM2024-07-14T19:07:44+5:302024-07-14T19:07:44+5:30

महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

Mahavitaran State Level Drama Competition: Konkan's 'Double Game' first, Nagpur Division's 'Nothing to Say' second | महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय

महावितरणच्या राज्यस्तरीय नाट्यस्पर्धा : कोकणचे 'डबल गेम' प्रथम, तर नागपूर विभागाचे ‘नथिंग टु से’ द्वितीय


नागपूर :- महावितरणच्या राज्यस्तरीय आंतर प्रादेशिक विभाग नाट्यस्पर्धेत कोकण प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या 'डबल गेम' नाटकाने सांघिक नाट्यनिर्मितीत प्रथम क्रमांकासह वैयक्तिक गटात पाच पारितोषिके पटकावली. तर ‘नथिंग़ टु से’ या नागपूर प्रादेशिक विभागाने सादर केलेल्या नाटकृतीस द्वितीय पारितोषिक मिळाले.

महावितरणचे संचालक (संचालन तथा मानव संसाधन) अरविंद भादिकर यांचे पारितोषिक वितरण करण्यात आले. वसंतराव देशपांडे सभागृह येथे आयोजित या दोन दिवसीय नाट्यस्पर्धेत पुणे प्रादेशिक विभागाने ‘ती फ़ुलराणी’, छत्रपती संभाजी नगर प्रादेशिक विभागाने ‘उत्तरदायित्व’, कोकण प्रादेशिक विभागाने ‘डबल गेम’, आणि नागपूर प्रादेशिक विभागाने ‘नथिंग टु से’ असे एकापेक्षा एक दर्जेदार नाट्यकृती सादर केल्या.

याप्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, अकोला परिमंडलाचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, मुख्यालयातील देयक व महसूल विभागाचे परेश भागवत, अमरावती परिमंडलाचे मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर, छत्रपती संभाजी नगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कच्छोट, चंद्रपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता हरिष गजबे, रत्नागिरी परिमंडलाच्या प्रभारी मुख्य अभियंता कल्पना पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी भरत पवार, या स्पर्धेचे परिक्षक प्रभाकर आंबोने, विनोद तुंबडे आणि मंजुश्री भगत डोंगरे प्रामुख्याने उपस्थित होते.

 संचालन रेणुका देशकर यांनी केले. तर सहमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसुदन मराठे यांनी आभार मानले.

- यांना मिळाले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट निर्मिती : (प्रथम) – डबल गेम, (द्वितीय) - नथिंग टु से
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : (प्रथम) – राजीव पुणेकर (डबल गेम), (द्वितीय) - संजय पुरकर (नथिंग टू से)
अभिनय – पुरूष : (प्रथम) – दुर्गेश जगताप (डबल गेम), (द्वितीय) - प्रसाद दिवाण (ती फुलराणी)
अभिनय – स्त्री : (प्रथम) – प्रज्ञा मुळे (डबल गेम), (द्वितीय) - श्वेता सांगलीकर (ती फुलराणी)
नेपथ्य : (प्रथम) – संजय कांबळे (ती फ़ुलराणी), (द्वितीय) - राजेंद्र जाधव (डबल गेम)
प्रकाश योजना : (प्रथम) - किशोर दाभेकर (नथिंग टु से), (द्वितीय) - सुनिल शिंदे (उत्तरदायित्व)
संगित : (प्रथम) - अनिल राजपूत (उत्तरदायित्व), (द्वितीय) - दिपक भोसले (ती फ़ुलराणी)
रंगभूषा व वेशभूषा : (प्रथम) - सतिश बनकर (ती फुलराणी), (द्वितीय) - राजश्री मोरे (डबल गेम)
बालकलाकार : राजश्री शिंदे (उत्तरदायित्व)
उत्तेजनार्थ : मंगेश कांबळे (ती फ़ुलराणी), पल्लवी गायकवाड (उत्तरदायित्व), अनुराधा गोखले (डबल गेम) आणि गौरी पुरकर (नथिंग टु से)

 

Web Title: Mahavitaran State Level Drama Competition: Konkan's 'Double Game' first, Nagpur Division's 'Nothing to Say' second

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.