महावितरण ‘केंद्रीय बिलिंग’ पद्धत यशस्वीपणे राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 10:11 PM2018-07-27T22:11:45+5:302018-07-27T22:13:09+5:30
पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी शुक्रवारी येथे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पुढील महिन्यापासून महावितरणकडून राज्यात केंद्रीय (सेन्ट्रलाईज) बिलिंग पद्धत राबवण्यात येणार आहे. नागपूर प्रादेशिक विभागात ही पद्धत यशस्वपणे राबविणार असून यासाठी विभागातील कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणचे नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र्र खंडाईत यांनी शुक्रवारी येथे केले.
महावितरणच्या नागपूर परिमंडळातील अधिकारी आणि कर्मचाºयांसाठी सेंन्ट्रलाईज बिलिंग पद्धतीची माहिती देण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित या कार्यशाळेत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, ३९ उप विभागीय अधिकारी, वरिष्ठ लेखा अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, उपविभागातील बिलिंग क्लार्क, माहिती तंत्रज्ञान विभागातील अधिकारी,बिलिंग एजन्सीचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. यावेळी खंडाईत म्हणाले, या अगोदर ठराविक भागातील वीज ग्राहकांच्या मीटरचे वाचन झाल्याशिवाय पुढचे पाऊल उचलण्यात येत नव्हते. पण केंद्रीय बिलिंग पद्धतीमुळे दररोज मीटर वाचन होऊन याची माहिती केंद्रीय प्रणालीत जमा होईल आणि दररोज वाचन झालेल्या मीटरचे देयक लगेचच दुसºया दिवशी वितरित करण्यात येणार आहे. नवीन पद्धत पूर्णत: पारदर्शी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, वर्धा मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता सुनील देशपांडे उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक अभियंता मोहमद फुरकान यांनी तर शहर मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ यांनी आभार मानले.