महावितरणचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 09:28 PM2019-01-31T21:28:21+5:302019-01-31T21:29:18+5:30

प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता.

Mahavitaran's picture chariot is the third position | महावितरणचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर

महावितरणचा चित्ररथ तिसऱ्या क्रमांकावर

Next
ठळक मुद्देमुंबई येथील शिवाजी पार्कवर झाले चित्ररथांचे प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त महावितरणच्या वतीने तयार करण्यात आलेल्या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून महावितरणने या चित्ररथात विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या संकल्पनेवर आधारित देखावा तयार केला होता.
प्रजासत्ताक दिनानिमित्त २६ जानेवारी रोजी मुंबई येथील शिवाजी पार्क येथे महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत असणाऱ्या विविध विभागांच्या वतीने चित्ररथाचे प्रदर्शन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला मॉरिशियसचे पंतप्रधान प्रवींद जुगनॉथ, महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी महावितरणने विजेमुळे शेती आणि शेतीमुळे प्रगती या मुख्य संकल्पनेवर आधारलेला देखावा चित्ररथासाठी तयार केला होता. यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, सौभाग्य योजना, उच्चदाब वीज वितरण प्रणाली या योजनेच्या यशस्वीतेवर आधारित देखाव्यांचा समावेश होता. चित्ररथाच्या देखाव्याचे मान्यवरांनी कौतुक केले होते.
महावितरणच्या या चित्ररथाला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून सर ज. जी. उपयोजित कला महाविद्यालयाचे अधिष्ठाता संतोष क्षीरसागर, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे अधिष्ठाता प्रा. विश्वनाथ साबळे व मुंबई विद्यापीठाच्या अकॅडेमी ऑफ थिएटर आर्टसचे संचालक डॉ. मंगेश बनसोड यांच्या निवड समितीने चित्ररथाचे नामांकन निश्चित केले. हा चित्ररथ कन्सेप्ट कम्युनिकेशन या एजन्सीच्या माध्यमातून तयार करण्यात आला.

 

 

 

Web Title: Mahavitaran's picture chariot is the third position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.