सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 08:33 PM2019-10-25T20:33:37+5:302019-10-25T20:35:37+5:30

दिवाळीत दुर्देवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे.

Mahavitran Instructions for Safe Diwali | सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणच्या सूचना

सुरक्षित दिवाळीसाठी महावितरणच्या सूचना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिवाळीत होत असलेली सजावट, रोषणाई आणि आतषबाजी यामुळे दुर्दैर्वी घटना व्हायला एक कारणही पुरेसे आहे, अशा घटनांनी आनंदाचे वातावरण दु:खात बदलायला वेळ लागत नसल्याने या दुर्देवी घटना टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवाळीच्या दिवशी फटाक्याने लागलेल्या आगीच्या घटना दरवर्षीच हजारोच्या संख्येने होत असतात, यात केवळ आर्थिकच नव्हे तर जीवित हानीही मोठ्या प्रमाणात होत असते. सुरक्षिततेची खबरदारी न घेतल्याने, निष्काळजीपणा आणि उदासीनता यामुळे या घटना होत असतात. आपल्या व आपल्या कुटुंबीयांचा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी महावितरणने काही खबरदारीचे उपाय सुचविले असून त्यावर अंमलबजावणी करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
दिवाळी आणि दिवे यांचे एक अतूट नाते आहे, त्यामुळे दिव्यांनी घराची सजावट करताना ते मोकळ्या जागेतच लावावेत. पडदे, बिछाना यापासून ते लांब असतील याची काळजी घ्यावी. लहान मुले आणि पाळीव प्राण्यांपासून दिवे दूर आणि उंचीवर तसेच पंखे, वीजतारा यापासूनही ते दूर ठेवावेत. उच्च दर्जाच्या दिव्यांच्या माळांचा वापर करावा, तुटलेल्या वीज तारा वापरू नये किंवा जोड देताना योग्य दर्जाच्या इन्सुलेशन टेपने त्या सुरक्षित करुन घ्यावेत, तुटलेले सॉकेट्स वापरू नये, घरात कुणीही नसताना सर्व विद्युत उपकरणे बंद करावीत. फटाके उडविल्यानंतर त्याचा होणारा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका, त्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.
हे लक्षात असू द्या
फटाके उडविताना मोकळ्या जागेतच उडवावेत
वीज तारांच्याजवळ फटाके उडवू नये
विजेच्या उपकरणांजवळ फटाके ठेवू नये
विद्युत सॉकेट्सवर अधिक भार टाकू नये
रोषणाईसाठी वापरण्यात येणारे विद्युत दिवे त्यांच्या तारा व सॉकेट्स तपासून घ्याव्यात.
फटाक्यांचा कचरा वीज यंत्रणेजवळ फेकू नका

 

 

Web Title: Mahavitran Instructions for Safe Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.