महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या  आरोपींना सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 07:08 PM2018-03-05T19:08:38+5:302018-03-05T19:10:37+5:30

वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणाºया महावितरणच्या अधिकाऱ्यास घरामध्ये कोंडून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.

Mahavitran officer beaten case,accused convicted | महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या  आरोपींना सक्तमजुरी

महावितरणच्या अधिकाऱ्यास मारहाण करणाऱ्या  आरोपींना सक्तमजुरी

Next
ठळक मुद्देप्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीजबिल वसुली व वीजमीटर तपासणी मोहीम राबविणाºया महावितरणच्या अधिकाऱ्यास घरामध्ये कोंडून मारहाण करणाऱ्या तीन आरोपींना सहा महिने सक्तमजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपयांचा दंड नांदेड जिल्ह्यातील उमरी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी ठोठावला आहे.
उमरी येथील महावितरणचे कनिष्ठ अभियंता सुनील कासनाळे हे २५ नोव्हेंबर २०१७ रोजी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांसोबत सिंधी या गावी वीजबिल वसुली व मीटरची तपासणी मोहीम राबवित होते. यावेळी शिवाजी पुयड हे अनधिकृतरीत्या आकडा टाकून वीज वापरत असल्याचे आढळून आल्यामुळे आकडा टाकून वीज चोरल्याबद्दलचा रीतसर पंचनामा करीत असताना शिवाजी पुयड आणि अन्य दोघांनी घराचा दरवाजा बंद करून पंचनाम्याचे कागदपत्र फाडून टाकले. त्याचबरोबर पंचनाम्याचे चित्रीकरण करणारे कर्मचारी बालाजी ढेरे यांना उग्रसेन पुयड व मारोती पुयड या आरोपींनी हातपाय धरून मारहाण करत मोबाईल काढून घेतला. तसेच इतर कर्मचाऱ्यांनाही कागदपत्रे फाडून धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली.
या प्रकरणी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर सरकार पक्षाने पाच साक्षीदार तपासले. ३ मार्च २०१८ रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. डी. जाधव यांनी उमरी तालुक्यातील सिंधी येथील नितीन बालाजी पुयड, उग्रसेन शिवाजी पुयड व मारोती शिवाजी पुयड या तिघांना ३५३,३४२,२०१,५०४, ५०६ सह ३४ या कलमांतर्गत प्रत्येकी सहा महिने सक्त मजुरीची शिक्षा व प्रत्येकी नऊ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे अजीम खान यांनी काम पाहिले.

 

 

 

Web Title: Mahavitran officer beaten case,accused convicted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.