महायुतीची लाेकसभेची तयारी, १४ जानेवारी पहिला मेळावा

By राकेश कदम | Published: January 11, 2024 06:34 PM2024-01-11T18:34:28+5:302024-01-11T18:36:09+5:30

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, राज्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी महायुतीचा मेळावा घेण्याचे आदेश तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिले आहेत.

Mahayuti preparation for Lok Sabha, 14th January first meeting | महायुतीची लाेकसभेची तयारी, १४ जानेवारी पहिला मेळावा

महायुतीची लाेकसभेची तयारी, १४ जानेवारी पहिला मेळावा

लाेकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी काॅंग्रेस अजितदादा गट यासह सात पक्षांच्या महायुतीचा मेळावा १४ जानेवारी राेजी आयाेजित करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या मेळाव्याला मार्गदर्शन करतील, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी गुरुवारी दिली.

आमदार कल्याणशेट्टी म्हणाले, राज्यात एकाच दिवशी विविध ठिकाणी महायुतीचा मेळावा घेण्याचे आदेश तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दिले आहेत. लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची बूथ बांधणी करणे, तालुकास्तरावर सभा घेण्याचे नियाेजन करणे यासह विविध मुद्यांवर महायुतीचे पदाधिकारी काम करणार आहेत. साेलापूर लाेकसभा मतदारसंघ भाजपकडेच राहिल. भाजपचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. उमेदवारीचा निर्णय पक्षच घेणार आहे. काॅंग्रेसकडून काेणीही उमेदवार असाे. भाजपच आगामी निवडणुकीत विजयाची हॅट्रीक करेल, असा विश्वास आमदार कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केला. १४ जानेवारी राेजी साेलापुरातील जामगुंडी मंगल कार्यालयात दुपारी तीन वाजता हा मेळावा हाेईल. याच पध्दतीने आगामी काळात तालुकास्तरावर मेळावा हाेतील, असेही कल्याणशेट्टी यांनी सांगितले. 
 

Web Title: Mahayuti preparation for Lok Sabha, 14th January first meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर