महेंद्र बोरसरेला १० वर्षे सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:10 AM2021-02-27T04:10:15+5:302021-02-27T04:10:15+5:30
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी महेंद्र बबन बोरसरे (वय ३४) याला १० वर्षे ...
नागपूर : विशेष सत्र न्यायालयाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी महेंद्र बबन बोरसरे (वय ३४) याला १० वर्षे सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ५ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली. न्या. के. जी. राठी यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
ही घटना कुही पोलिसांच्या हद्दीतील भोलाहुडकी येथे ४ जानेवारी २०१९ रोजी घडली. त्यावेळी पीडित मुलगी १४ वर्षे वयाची होती. ती तब्येत चांगली वाटत नसल्यामुळे दुपारी २ वाजता शाळेतून घरी परत आली होती. तिचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतात गेले होते. दरम्यान, आरोपीने घरात प्रवेश करून मुलीवर बळजबरीने लैंगिक अत्याचार केला. मुलीने ओरडण्याचा प्रयत्न केला असता, आरोपीने तिचे तोंड दाबून ठेवले. मुलीने आई-वडील घरी आल्यानंतर त्यांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. दरम्यान, त्यांनी लगेच पोलीस ठाण्यात पोहोचून आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली. न्यायालयात सरकारच्या वतीने ॲड. आसावरी पळसोदकर यांनी कामकाज पाहिले.