२४ ग्रामपंचायतीत महिलाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:27 AM2020-12-11T04:27:07+5:302020-12-11T04:27:07+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क कामठी : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी चक्रानुक्रमे आरक्षण साेडत काढण्यात आली. यात २४ ग्रामपंचायतींचा ...

Mahila Raj in 24 Gram Panchayats | २४ ग्रामपंचायतीत महिलाराज

२४ ग्रामपंचायतीत महिलाराज

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी चक्रानुक्रमे आरक्षण साेडत काढण्यात आली. यात २४ ग्रामपंचायतींचा कारभार महिलांच्या हाती आला तर काही ग्रामपंचायतीत अपेक्षित आरक्षण न निघाल्याने इच्छुकांचे सरपंचपदाचे स्वप्न भंगले आहे.

तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतींचे २०२० ते २०२५ या वर्षाकरिता होणाऱ्या निवडणुकीसाठी सदर आरक्षण साेडत जाहीर करण्यात आली. निघालेल्या आरक्षणामुळे येरखेडा, महालगाव, भूगाव या तिन्ही मोठ्या ग्रामपंचायतीचे आरक्षण अनुसूचित जातीकरिता राखीव झाल्याने अनेक इच्छुकांना धक्के बसले.

अनुसूचित जातीकरिता आरक्षित आठ ग्रामपंचायतीमध्ये महालगाव, भूगाव, येरखेडा, आवंढी, नान्हा(महिला), सुरादेवी(महिला), नेरी (महिला), लिहिगाव (महिला), अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी उमरी, वारेगाव (महिला) खेडी (महिला) या तीन ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत.

नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव १३ ग्रामपंचायतींमध्ये कवठा, आजनी, बिना, रनाळा, टेमसना, परसाड, जाखेगाव (महिला), गुमथळा (महिला), खापा (महिला), चिखली (महिला), वरंभा (महिला), भामेवाडा (महिला), घोरपड (महिला) समावेश आहे. सर्वसाधारण प्रवर्गाकरिता लाेणखैरी, कोराडी, भिलगाव, भोवरी, कढाेली, दिघोरी बुजरुक, दिघोरी, गारला, वडोदा, आडका, पवनगाव, चिकना, सोनेगाव राजा (महिला), गुमथी (महिला), खसाला (महिला), खैरी (महिला), शिवनी (महिला), केसोरी (महिला), कापसी बु. (महिला), केम (महिला), गादा (महिला), बिडगाव (महिला), बाबुलखेडा (महिला) या २३ ग्रामपंचायतीचे आरक्षण तहसीलदार गणेश जगदाळे यांनी जाहीर केले. यावेळी परिविक्षाधीन तहसीलदार जितेंद्र शिकतोडे, नायब तहसीलदार एस. एम. कवटी, सहायक गटविकास अधिकारी प्रदीप गायगोले तसेच जि. प. सदस्य नाना कंभाले, पंचायत समितीचे उपसभापती आशिष मलेवार, पं. स. सदस्य सुमेध रंगारी, मनीष कारेमोरे, नरेश मोहबे, राजकिरण बर्वे, मनोहर कोरडे आदी उपस्थित होते.

Web Title: Mahila Raj in 24 Gram Panchayats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.