महामूर्ख संमेलन राष्ट्रीय उत्सव !

By Admin | Published: June 15, 2016 03:05 AM2016-06-15T03:05:33+5:302016-06-15T03:05:33+5:30

होळीच्या निमित्ताने मस्करी, मूर्खपणा, हास्यकविता, व्यंग, टिप्पणी करणे आपल्या समाजात मान्य करण्यात आले आहे.

Mahmukhar Convention National Festival! | महामूर्ख संमेलन राष्ट्रीय उत्सव !

महामूर्ख संमेलन राष्ट्रीय उत्सव !

googlenewsNext

दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचा जावईशोध : हा देश फक्त मूर्खांचाच आहे काय?
राजेश पाणूरकर : मंगेश व्यवहारे नागपूर
होळीच्या निमित्ताने मस्करी, मूर्खपणा, हास्यकविता, व्यंग, टिप्पणी करणे आपल्या समाजात मान्य करण्यात आले आहे. कुणाचेही मन न दुखविता एखाद्यातील उणिवा व्यंगाच्या माध्यमातून दाखविणे यात काही चूक नाही. परस्पर सामंजस्याने आणि खेळकरपणे केलेली टीका आपल्या समाजात मान्य करण्यात आली आहे.

पण केंद्र सरकारच्या एखाद्या जबाबदार कार्यालयाने महामूर्ख संमेलन घेताना तब्बल दहा लाख रुपयांचा खर्च करणे आणि महामूर्ख संमेलन राष्ट्रीय उत्सव असल्याचे सांगणे म्हणजे गाढवालाही ताप आणण्यासारखे आहे. त्यात माहितीच्या अधिकारात या संमेलनावर इतका खर्च कसा झाला, असे विचारले असता मूर्ख कधीही, कुठेही, काहीही करू शकतो, असे बेजबाबदार उत्तर देण्यात आले आहे. हा देश काय फक्त मूर्खांचाच आहे का? पण दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने हा देश मूर्खांचाच आहे, असे लिखित स्वरुपात शिक्कामोर्तब केले आहे.
केंद्राने १ एप्रिल रोजी दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक कें द्रात अधिकृतपणे ‘राष्ट्रीय महामूर्ख संमेलन’ आयोजित केले. राष्ट्रीय उत्सव म्हणून केंद्राने त्याचे नामाभिधान केले आणि वर्तमानपत्रात त्याच्या जाहिरातीही देण्यात आल्या. राष्ट्रीय नावाबद्दल आक्षेप घेण्याचे तसे विशेष कारण नव्हते पण माहितीच्या अधिकारात या जबाबदार केंद्राने मात्र हे राष्ट्रीय महामूर्ख संमेलन राष्ट्रीय उत्सव म्हणून आयोजित करण्यात आल्याचे सांगितले आहे.
या संमेलनासाठी किती खर्च झाला, अशी विचारणा केली असता त्यावर तब्बल ९ लाख ३० हजार ७०५ रुपये खर्च झाल्याची माहिती केंद्राने दिली. अडीच तासांच्या कार्यक्रमावर इतका खर्च कसा झाला, या प्रश्नाच्या उत्तरात केंद्राने दिलेले उत्तर मूर्खपणाचा कळस आहे.

Web Title: Mahmukhar Convention National Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.