महामेट्रो स्टेशन होणार झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:09 AM2021-06-16T04:09:24+5:302021-06-16T04:09:24+5:30

हेरिटेज समितीची नामांतराला मंजुरी : ऐतिहासिक तोफा ठेवण्याला मुभा लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने ...

Mahometro Station will be Zero Mile Freedom Park Station | महामेट्रो स्टेशन होणार झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन

महामेट्रो स्टेशन होणार झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन

Next

हेरिटेज समितीची नामांतराला मंजुरी : ऐतिहासिक तोफा ठेवण्याला मुभा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिन निमित्ताने प्रधानमंत्री कार्यालयातर्फे अमृत महोत्सव सोहळ्यात झिरो माईल येथील मेट्रो स्टेशनचे ‘झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन’ असे नामकरण करण्यात येणार आहे. या अनुषंगाने समितीने कस्तूरचंद पार्क मैदान येथे विकास कामे करतांना सापडलेल्या ऐतिहासिक तोफा झिरो माईल फ्रीडम पार्क स्टेशन येथे ठेवण्यात येतील. महामेट्रो नागपूरच्या या प्रस्तावाला मंगळवारी नागपूर हेरिटेज संवर्धन समितीच्या बैठकीत मंजुरी प्रदान करण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालय येथील श्री. छत्रपती सभागृह येथे हेरिटेज संवर्धन समितीची बैठक झाली. यावेळी स्ट्रक्चरल अभियंता पी. एस.पाटणकर, नागपूर विद्यापीठाच्या इतिहास विभागाच्या प्राध्यापक डॉ. शुभा जोहरी, वास्तुविशारद अशोक मोखा, उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम आणि सहायक संचालक नगररचना हर्षल गेडाम उपस्थित होते.

महामेट्रोतर्फे फुटाळा तलावालगत प्रेक्षक दीर्घेच्या व बोगद्याच्या बांधकामाकरिता दिलेल्या बांधकाम नकाशात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार आता भूमिगत बोगदा न बांधता त्या जागेत प्रेक्षक दीर्घेचे काम प्रस्तावित आहे. तसेच फुटाळा येथे संगीतमय कारंजे, लाईट आणि साऊंड शो इत्यादी विकास कामाला समितीने मंजुरी दिली.

महाल येथील कोतवाली पोलिस स्टेशन व पोलिस उपायुक्त परिमंडल - ३ यांचे कार्यालय असलेली इमारत हेरिटेज ग्रेड - १ चे स्थळ आहे. या इमारतीला १०० वर्षापेक्षा जास्त कालावधी झाल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग क्र-१ नागपूर यांनी या इमारतीचे व्ही.एन.आय.टी. नागपूर या शासकीय संस्थेकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून व्ही.एन.आय.टी.ने दिलेल्या अहवालानुसार उक्त इमारत ३ ते ४ वर्षापेक्षा जास्त कालावधीकरिता वापरण्यास सुरक्षित नाही. त्यामुळे कोतवाली पोलिस स्टेशन व पोलिस उपायुक्त परिमंडळ -३ यांचे कार्यालयाकरिता स्वतंत्र जागेची व बांधकामाकरिता निधीची व्यवस्था करावी, असे सार्वजनिक बांधकाम कार्यकारी अभियंता यांनी पोलिस उपायुक्त (मुख्यालय) यांना कळविले आहे.

Web Title: Mahometro Station will be Zero Mile Freedom Park Station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.