हजारो कष्टकरी महिलांना ‘माई’ने केले आत्मनिर्भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 06:11 PM2018-05-03T18:11:55+5:302018-05-03T18:20:50+5:30

सामाजिक कार्यकर्त्या व वीरश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयोजक अनुराधा रघुते (माई) यांनी असे सव्वाशेहून अधिक विस्कटलेले संसार नव्याने सावरले. तसेच ज्यांना बँका आपल्या दारात उभे करीत नाही, अशा गरजू व कष्टकरी महिलांचे बचतगट गट निर्माण करून मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध के ले. मागील काही वर्षात १५ ते २० हजार महिलांना सक्षम बनवून आत्मनिर्भर केले. आज यातील अनेक महिला यशस्वी उद्योजिकाही झाल्या आहेत.

Mai had made self-reliant to thousands of working women | हजारो कष्टकरी महिलांना ‘माई’ने केले आत्मनिर्भर

हजारो कष्टकरी महिलांना ‘माई’ने केले आत्मनिर्भर

googlenewsNext
ठळक मुद्देविस्कटलेले १२५ संसार पुन्हा सावरले : शिबिरातून लहान मुलांवरही संस्कार

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संसार म्हटला की लहानसहान वाद होतच असतात. अनेकदा गैरसमज होऊ न वाद विकोपाला गेल्याने कुटुंबात मनमुटाव निर्माण होतो. प्रकरण न्यायालयात पोहोचते. संसाराची घडी विस्कटते, अशा महिलांना वेळीच आधार मिळाला तर संसार सावरू शकतात. सामाजिक कार्यकर्त्या व वीरश्री जिजाऊ प्रतिष्ठानच्या संयोजक अनुराधा रघुते (माई) यांनी असे सव्वाशेहून अधिक विस्कटलेले संसार नव्याने सावरले. तसेच ज्यांना बँका आपल्या दारात उभे करीत नाही, अशा गरजू व कष्टकरी महिलांचे बचतगट गट निर्माण करून मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगारासाठी बिनव्याजी कर्ज उपलब्ध के ले. मागील काही वर्षात १५ ते २० हजार महिलांना सक्षम बनवून आत्मनिर्भर केले. आज यातील अनेक महिला यशस्वी उद्योजिकाही झाल्या आहेत.
सर्वसामान्य कुटुंबातील अनुराधा रघुते यांना आपल्या जीवनातही संघर्ष करावा लागला. यातूनच त्यांना समाजातील निर्धन, कष्टकरी महिलांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली. विधवा व निराधार महिला, हातगाडीवर लहानसहान व्यवसाय करणाऱ्या, रस्त्याच्या कडेला फूटपाथवर वा आठवडी बाजारात भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाºया महिलांना मदतीचा हात दिला. १० ते १५ हजाराचे मायक्रो फायनान्सच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित केले. मागील काही वर्षांपूर्वी याला सुरुवात केली. बघताबघता महिलांची संख्या १५ ते २० हजारावर गेली. ज्यांना मदत केली, त्यांनीही प्रामाणिकपणे पैशाची परतफेड केल्याने या उपक्रमाशी नवीन गरजू महिला जोडल्या गेल्या. कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसताना हजारो महिला एकत्र आल्या. त्यांच्या आयुष्यात बदल व्हावा, जीवनात आनंदाचे काही क्षण यावे, यासाठी कष्टासोबतच व्यवस्थित राहण्याचा सल्ला दिला जातो. यासाठी स्नेहसंमेलन, सणवार एकत्रित साजरे करणे, देशातील महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटन, गरीब कुटुंबातील मुलांसाठी संस्कार शिबिराचे आयोजन, गुणवंत मुलांचा गौरव असे उपक्रम राबविले जातात.
अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून महिलांना विकासाच्या प्रवाहाशी जोडण्याचा प्रयत्न आहे. विशेष म्हणजे अनुराधा रघुते यांच्या संस्थेशी समाजातील सर्व जातीधर्माच्या महिला जोडलेल्या आहेत. या कार्याची दखल घेत त्यांना पुणे येथील जय शंकर प्रतिष्ठानचा २०१७ या वर्षाचा श्रीमती माई ऊर्फ सुशीला दत्तात्रय अभ्यंकर पुरस्कार, जय भवानी महिला सहकारी पतसंस्थेच्या वतीने कर्तृत्वान महिला पुरस्कार देण्यात आला आहे. अनुराधा रघुते यांनी विविध क्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
महिलांच्या जीवनात आनंद फुलवण्यात वेगळाच आनंद
गरीब व कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यात वेगळेच समाधान मिळते. अशा महिलांच्या समस्या जाणून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, व्यवसायासाठी त्यांना आर्थिक साहाय्य करून आत्मनिर्भर करण्याचा प्रामाणिक हेतू आहे. सोबतच आजच्या काळानुरू प त्यांचे जीवनमान उंचवावे, त्यांना अडीअडचणीत मदत करणे, लहान मुलांवर चांगले संस्कार व्हावेत, असा प्रयत्न आहे. या सामाजिक कार्यात वेगळचे समाधान आहे.
अनुराधा रघुते, सामाजिक कार्यकर्त्या

 

Web Title: Mai had made self-reliant to thousands of working women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.