माैद्यातील एटीएम बंद, ग्राहकांना मनस्ताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:07 AM2021-06-30T04:07:10+5:302021-06-30T04:07:10+5:30
माैदा : शहरातील बॅंक ग्राहकांना २४ तास सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बहुतेक सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांची डझनभर एटीएम माैदा ...
माैदा : शहरातील बॅंक ग्राहकांना २४ तास सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने बहुतेक सर्वच राष्ट्रीयीकृत बॅंकांची डझनभर एटीएम माैदा शहरात आहेत. परंतु स्थानिक युनियन बॅंक शाखेचे एटीएम गेल्या अनेक महिन्यांपासून सतत बंद राहत असल्याने ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या बॅंक शाखेच्या ग्राहकांना इतर बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढावे लागतात. यामुळे ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड पडताे. बंद एटीएमची दुरुस्ती करण्याबाबत ग्राहकांनी शाखा व्यवस्थापकाकडे अनेकदा मागणी केली. मात्र त्याची कुणीही दखल घेत नसल्याने नागरिकांतून संताप व्यक्त हाेत आहे. एटीएम मशीन नादुरुस्त असल्याने ग्राहक अन्य बॅंकेच्या एटीएममधून पैसे काढतात. अशावेळी ग्राहकांच्या माेबाईलवर मात्र युनियन बॅंकेच्या एटीएमचा उपयाेग करा, असा सल्ला देणारा मेसेज प्रत्येक ग्राहकांना येताे. त्यामुळे युनियन बॅंकेच्या एटीएमची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अथवा नादुरुस्त मशीन बदलण्याची मागणी नागरिकांची आहे.