ग्रामीण नागरिकांच्या आरोग्यासाठी पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा
By गणेश हुड | Published: April 20, 2023 06:55 PM2023-04-20T18:55:17+5:302023-04-20T18:55:51+5:30
ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमत पाणी तपासणी, तपासणीत दूषित आढलेल्या स्त्रोतांवर तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश Nagpur News जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिले.
गणेश हूड
नागपूर : जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागाला शुध्द व शाश्वत पाणी पुरवठा करण्यासोबतच आता पाण्याची गुणवत्ता अबाधित ठेवा. यासाठी पाणी गुणवत्ता विषयाच्या संदर्भाने कार्यरत घटकांना प्रशिक्षित करणे, ग्रामीण जनतेचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी नियमत पाणी तपासणी, तपासणीत दूषित आढलेल्या स्त्रोतांवर तातडीने उपाययोजना करा, असे निर्देश गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा यांनी दिले.
जल जीवन मिशन, पाणी आणि स्वच्छता विभाग आणि आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, नागपूर यांच्या संयुक्त विद्यामाने जि.प.च्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात जिल्हास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी सौम्या शर्मा यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पाणी तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन विभाग नीरीचे प्रधान वैज्ञानिक, डॉ अतुल मालधूरे, पाणी आणि स्वच्छता विभागाचे प्रकल्प संचालक संजय वानखेडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उमल चांदेकर, अति. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षा मेश्राम, भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. वर्षा माने, प्रादेशिक आरोग्य प्रयोगशाळा अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपअभियंता, विस्तार अधिकारी पंचायत व आरोग्य आदी उपस्थित होते.