सातनवरी, शिवा येथे ‘माझी पाेषण परसबाग’ माेहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:11 AM2021-07-14T04:11:23+5:302021-07-14T04:11:23+5:30
‘उमेद’ अभियानाच्या कृतिसंगम विभागांतर्गत अन्न, आराेग्य, पाेषण व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून ही माेहीम राबविली जात आहे. ...
‘उमेद’ अभियानाच्या कृतिसंगम विभागांतर्गत अन्न, आराेग्य, पाेषण व स्वच्छता कार्यक्रमांतर्गत महिला बचत गटाच्या माध्यमातून ही माेहीम राबविली जात आहे. बचत गटातील महिला, किशोरवयीन मुली, तसेच लहान बालके यांच्या सुदृढ आरोग्यासाठी व कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याची उपलब्धता, आहारातील विविधता, योग्य आहाराच्या पद्धती, अन्नसुरक्षा व पोषण सुरक्षा याबाबत गावस्तरावर सभेद्वारे मार्गदर्शन करण्यात येत आहे. गावस्तरावरील समितीची क्षमता बांधणी करून ‘माझी पोषण परसबाग’ माेहिमेंतर्गत उमेदतर्फे महिलांना पोषण परसबाग निर्मितीचे धडे दिले जात आहेत. भारती स्वयंसाहाय्यता महिला बचत गटांना व नागरिकांना प्रात्यक्षिके व मार्गदर्शनातून पोषण परसबाग तयार करण्याबाबत माहिती देण्यात आली. परसबागेतून महिलांच्या कुटुंबीयांना दररोज सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या विविध ताज्या पालेभाज्या, फळभाज्या व औषधी वनस्पती उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.
यावेळी कमल विजय पन्नासे, निर्मला मोरे, अनिता झाडे, वैशाली चौधरी, रूपाली वानखेडे, चंदा मोरे, छबू मोरे, वंदना भोगे, मनीषा मेश्राम, अलका झंझाळ, रत्नमाला सोनबरसे, लता सोनवणे, निर्मला गोतमारे, अंजू डेंगे, अश्विनी पन्नासे, कविता भोयर, शैलेंद्र पाटील आदींची उपस्थिती हाेती.