नागपुरात तलाठी परीक्षा खोळंबली; सर्व्हर डाऊन, विद्यार्थ्यांना मनस्ताप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:36 AM2023-08-21T10:36:54+5:302023-08-21T10:39:16+5:30
परीक्षेची वेळ सकाळी ९ ते ११ मात्र १० वाजूनही विद्यार्थी परीक्षा केंद्राबाहेरच खोळंबले : काही ठिकाणी सर्व्हरची समस्या सोडवणयात आली असून इतर ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती
नागपूर : राज्यातील अनेक जिल्ह्यात तलाठी भरतीची परीक्षा आज (२१ ऑगस्ट) पार पडत आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हरच डाऊन झाल्याने विद्यार्थ्यांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. काही ठिकाणी सर्व्हरची समस्या सोडवणयात आली असून इतर ठिकाणी काम सुरू असल्याची माहिती आहे. मात्र, यामुळे परीक्षार्थ्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
तलाठी भरतीचा पेपर सकाळी ९ ते ११ दरम्यान होणार होता. मात्र, सकाळपासूनच सर्व्हर डाऊन असल्याने पेपर सुरुच झाला नाही. त्यामुळे परीक्षेसाठी दूरवरून आलेल्या परीक्षार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. परीक्षेची वेळ होऊन देखील परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्राबाहेरच थांबवे लागत आहे. नागपूर येथील नागपूर येथील एमआयडीसी परिसरातील केंद्राबाहेर हा प्रकार घडला असल्याची तक्रार समोर आली आहे. तर अमरावतीमध्येही असेच घडल्याची माहिती आहे. या प्रकाराने परीक्षार्थींमध्ये पुन्हा एकदा सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे.