पाेटा येथे ग्रामविकास आघाडीला बहुमत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:09 AM2021-01-20T04:09:54+5:302021-01-20T04:09:54+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क खापरखेडा : सावनेर तालुक्यातील पाेटा (चनकापूर) ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल साेमवारी (दि. ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
खापरखेडा : सावनेर तालुक्यातील पाेटा (चनकापूर) ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी घेण्यात आलेल्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल साेमवारी (दि. १८) जाहीर करण्यात आले. यात काँग्रेस-राष्ट्रवादी काॅंग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीने नऊ जागा जिंकत बहुमत मिळविले असून, भाजप-शिवसेना-रिपाइं समर्थित नगर विकास परिवर्तन आघाडीला सात तर वंचित बहुजन आघाडी समर्थित लाेकशाही आघाडीला एक जागा मिळाली आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित ग्रामविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांमध्ये वाॅर्ड क्रमांक-१ मधील पवन रमेश धुर्वे, वॉर्ड क्रमांक-२ मधील सिद्धार्थ महादेव माणेराव, विश्वजित राजेंद्र सिंह व आरती रूपेश सावरकर, वॉर्ड क्रमांक-४ मधील राजेंद्र नागोराव इंगोले व रिता रामसेवक भरती, वॉर्ड क्रमांक-५ मधील श्रद्धा घनश्याम बेले, वॉर्ड क्रमांक-६ मधील रंजना मधुकर चोरपगार व सुशीला शंकर खापरे यांचा समावेश आहे.
भाजप-शिवसेना-रिपाइं समर्थित नगर विकास परिवर्तन आघाडीचे वॉर्ड क्रमांक-१ मधून सिद्धार्थ उकंडराव बागडे व शीतल नितीन गोस्वामी, वॉर्ड क्रमांक-३ मधून अनिल जगतराम छाणीकर व राजश्री राहुल राऊत, वॉर्ड क्रमांक-४ मधून रंजना अशोक कांबडे, वॉर्ड क्रमांक-५ मधून मनीषा दिनेश भड व येशुकांत शंकर काकडे विजयी झाले आहेत. वंचित बहुजन आघाडी समर्थित लोकशाही आघाडीच्या उमेश सिद्धार्थ दांडगे यांनी वाॅर्ड क्रमांक-६ मधून विजय संपादन केला.
...
‘क्राॅस व्हाेटिंग’चा फटका
पाेटा येथील एकूण सहा वाॅर्डांमधून १७ उमेदवार निवडून द्यावयाचे हाेते. या १७ जागांसाठी ६८ उमेदवार निवडणूक रिंगणात हाेते. येथील वाॅर्ड क्रमांक-२ मध्ये ग्रामविकास आघाडीचे तर वाॅर्ड क्रमांक-३ मध्ये नगर विकास परिवर्तन आघाडीचे सलग प्रत्येकी तीन व दाेन उमेदवार विजयी झाले. उर्वरित वाॅर्ड क्रमांक १, ४, ५ व ६ मध्ये ‘क्राॅस व्हाेटिंग’ झाले. याचा सर्वाधिक फटका ग्रामविकास आघाडीच्या उमेदवारांना बसला. ग्रामविकास आघाडीच्या उमेदवार तथा माजी सरपंच वंदना ढगे यांना मतदारांनी वाॅर्ड क्रमांक-१ मधून नाकारले तर याच वाॅर्डातून त्यांचे सहकारी तथा सर्वात कमी वयाचे उमेदवार पवन धुर्वे यांनी निवडून दिले. दुसरीकडे, नगर विकास परिवर्तन आघाडीचे उमेदवार तथा माजी सरपंच अनिल छाणीकर, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा ग्रामविकास आघाडीचे विश्वजित सिंह, राजेंद्र इंगोले व सुशीला खापरे यांना मात्र मतदारांनी पुन्हा संधी दिली आहे.