ताजबाग येथे सुविधा उपलब्ध करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 01:15 AM2017-10-06T01:15:32+5:302017-10-06T01:17:24+5:30
ताजबाग येथील यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी सर्व पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांमध्ये मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य, परिसर स्वच्छता ......
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ताजबाग येथील यात्रेसाठी येणाºया भाविकांसाठी सर्व पायाभूत सोईसुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या सुविधांमध्ये मोबाईल टॉयलेट, पिण्याचे पाणी, आरोग्य, परिसर स्वच्छता व साफसफाईकडे प्राधान्याने लक्ष देत ही कामे जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्या. यावेळी ताजबाग परिसरातील कामाची त्यांनी पाहणी केली. ऊर्स आयोजनाबाबतच्या बैठकीदरम्यान उपस्थित अधिकाºयांना सूचना दिल्या.
मोठा ताजबाग येथील सभागृहात आयोजित बैठकीदरम्यान आ. सुधाकर कोहळे, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, मनपा आयुक्त अश्विन मुद्गल, अपर आयुक्त रवींद्र कुंभारे, ताजबाग ट्रस्टचे प्रशासक गुणवंत कुबडे, कार्यकारिणी समितीचे सदस्य सय्यद जिलानी, साहाय्यता समितीचे सदस्य अयान खान उपस्थित होते. ताजबाग परिसरातील विकास कामे वेगाने सुरू असून यात्रेसाठी येणाºया भाविकांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून कडक बंदोबस्ताची कार्यवाही पोलीस विभागाकडून करण्यात येईल. तसेच पिण्याचे पाणी, स्वच्छता या सुविधा १० आॅक्टोबरपर्यंत पूर्ण कराव्यात, अशा सूचना बावनकुळे यांनी केल्या.
दीक्षाभूमीप्रमाणे नियोजनाचे प्रयत्न
दीक्षाभूमी येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमासाठी महानगरपालिकेने केलेल्या नियोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून कौतुक करण्यात आले असून ताजबाग उर्ससाठी देण्यात येणाºया सुविधांच्या नियोजनासाठी प्रयत्नरत आहोत, असे पालकमंत्री बावनकुळे यांनी ताजबाग ट्रस्ट व विविध विभागांच्या उपस्थित अधिकाºयांना आढावा बैठकी दरम्यान सांगितले.