आरोग्य रक्षकाचे रक्षण करणारा कायदा करा : आयएमए
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 08:12 PM2019-06-14T20:12:13+5:302019-06-14T20:13:51+5:30
कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकाचे रक्षण करा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोलकाता येथील एनआरएस वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टरवर रुग्णाच्या नातेवाईकांकडून झालेल्या जीवघेणा हल्ल्याचा निषेध करीत ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (आयएमए) नागपूर शाखेने डॉक्टरांवर होणारे हल्ले थांबविण्यासाठी तातडीने एक केंद्रीय कायदा करून आरोग्य रक्षकाचे रक्षण करा, या मागणीचे निवेदन शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिले.
कोलकाता येथील तरुण डॉक्टरवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद शुक्रवारी देशभरात उमटले. सेंट्रल मार्डने कामबंद आंदोलन करून लक्ष वेधले. आयएमए नागपूरनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला. काळ्या फिती लावून रुग्णसेवा दिली. डॉक्टरांवर वाढते हल्ले थांबविण्यासाठी कठोर कायद्याची गरज असल्याचे एक निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने प्रभारी जिल्हाधिकारी श्रीकांत फडके यांना दिले. शिष्टमंडळात आयएमए अध्यक्ष डॉ. कुश झुनझुनवाला, सचिव डॉ. मंजुषा गिरी, डॉ. अशोक अढाव, डॉ. मिलिंद नाईक, डॉ. वाय. एस. देशपांडे, डॉ. क्रिष्णा पराते, डॉ. आनंद काटे, डॉ. दिलीप गोडे, डॉ. प्रकाश देव, डॉ. अर्चना कोठारी, डॉ. राफत खान, डॉ. अलोक उमरे, डॉ. अर्चना देशपांडे, डॉ. अनिरुद्ध देवके, डॉ. अविनाश वासे, डॉ. गौरी अरोरा, डॉ. दिनेश अग्रवाल, डॉ. संजय देवतळे, डॉ. संजय देशपांडे, डॉ. वंदना काटे, डॉ. विवेक गाडगे, डॉ. ऋषी लोढाया, डॉ. मिलिंद भृशुंडी, डॉ. केळकर आदी उपस्थित होते.