विदर्भातील औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:09 AM2021-02-08T04:09:10+5:302021-02-08T04:09:10+5:30

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांनी राज्याचे अर्थ व योजनामंत्री अजित पवार यांना नागपूर भेटीदरम्यान ...

Make more provision in the budget for industrial development in Vidarbha | विदर्भातील औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद करा

विदर्भातील औद्योगिक विकासासाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद करा

Next

नागपूर : विदर्भ इंडस्ट्रिज असोसिएशनचे (व्हीआयए) अध्यक्ष सुरेश राठी यांनी राज्याचे अर्थ व योजनामंत्री अजित पवार यांना नागपूर भेटीदरम्यान अर्थसंकल्पपूर्व निवेदन देऊन विदर्भातील औद्योगिक विकासासाठी जास्त तरतूद करण्याची मागणी केली.

व्हीआयएने उद्योग-व्यवसायाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र शासनातर्फे देशात राज्याची सर्वोत्तम स्थिती कायम राखण्यासाठी विदर्भाच्या योगदानाची प्रशंसा केली. कोरोना महामारीमुळे विदर्भातील उद्योगाची पीछेहाट झाली असून, काही कर सवलत आणि काही प्रक्रियांचे सरळीकरण करण्याची मागणी केली.

विदर्भ आणि मराठवाडा भागासाठी देण्यात येणारी १२०० कोटींची वीज सबसिडी २५०० कोटींपर्यंत वाढविण्यात यावी. नवीन उद्योगासंदर्भात पीएसआय योजनेत परिवर्तन, विदर्भातील कंपन्यांसाठी वीज लाभांमध्ये दुहेरी गणना, एसजीएसटी रिफंड वा भांडवली सबसिडीसाठी कंपन्यांचा पर्याय, वीज बिलासह व्याजात सबसिडी, सेवा क्षेत्राला प्रोत्साहन, पीएसआय २०१९ करिता नवीन एमएसएमईचा पर्याय आणि ऑफलाइन अर्जाचा विचार करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

टेक्सटाइल सबसिडीच्या आवंटनावर यावेळी चर्चा करण्यात आली. याप्रसंगी विनीत मोहता, आदित्य बिहानी, रोहित रांदड, आयुष सिंघानिया, सुमित लखानी, सर्वेश बजाज आणि व्हीआयएचे माजी अध्यक्ष अतुल पांडे व उपाध्यक्ष ओ.एस. बागडिया उपस्थित होते. प्रतिनिधी मंडळाने वित्तीय संस्था, बँकांतर्फे करण्यात आलेले एमआयडीसी जमीन, भवन आणि निलामीसाठी रेडिरेकनर दराचा उपयोग करण्याची मागणी केली. सुरेश राठी यांनी गतिशील नेतृत्व आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या शासनाच्या उपक्रमांची प्रशंसा केली. विदर्भातील उद्योगांच्या विकासाकडे लक्ष केंद्रित करण्याची अजित पवार यांच्याकडे त्यांनी मागणी केली.

पवार यांनी व्हीआयएचे विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासाठी करण्यात येणारे विशेष प्रयत्न आणि उपायांची प्रशंसा केली. व्हीआयएने दिलेल्या सूचनांवर विचार करण्याचे आश्वासन पवार यांनी दिले.

Web Title: Make more provision in the budget for industrial development in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.