बनवा नैसर्गिक रंग, वाढवा रंगोत्सवाचा आनंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2020 01:07 AM2020-03-10T01:07:49+5:302020-03-10T01:08:59+5:30

रंगाच्या वापरामुळे त्वचेला पोहचणारी हानी, डोळ्यांना होणारी इजा, शरीरावरील जखमांवर होणारा परिणाम असे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र नैसर्गिक रंगांचा वापर केला तर संभाव्य हानींवर मात करून रंगोत्सवाचा आनंद अधिक वाढविता येणार आहे.

Make natural colors, enhance the fun of the festival | बनवा नैसर्गिक रंग, वाढवा रंगोत्सवाचा आनंद

बनवा नैसर्गिक रंग, वाढवा रंगोत्सवाचा आनंद

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रंगपंचमी म्हटले की रंग आलेच; मात्र अलीकडे रासायनिक रंगांच्या वापरामुळे या उत्सवाचा बेरंग होत आहे. या रंगाच्या वापरामुळे त्वचेला पोहचणारी हानी, डोळ्यांना होणारी इजा, शरीरावरील जखमांवर होणारा परिणाम असे अनेक दुष्परिणाम आहेत. मात्र नैसर्गिक रंगांचा वापर केला तर संभाव्य हानींवर मात करून रंगोत्सवाचा आनंद अधिक वाढविता येणार आहे.
हे नैसर्गिक रंग तयार करण्यासाठी अगदी साधी सोपी पद्धत आहे. रोजच्या दैनंदिन वापरातील भाज्या, फळे यांचा वापर क रून हे रंग घरच्या घरी तयार करता येण्याजोगे आहेत. विशेष म्हणजे हे रंग पूर्णत: नैसर्गिक असल्याने याच्या वापराचा कोणताही अपाय होत नाही. रंग तयार करण्यासाठी मुलांना मित्रांंची आणि आईवडिलांची मदत मिळत असल्याने या सणाचा आनंद आपोआपच सर्र्वांमध्ये वाटला जाऊ शकतो. चला तर मग, रंगोत्सवाचा आनंद वाढविण्यासाठी घरीच बनवू या नैसर्गिक रंग !

असे बनवा रंग

  • गुलाबी रंग : गुलाबी रंग तयार करण्यासाठी तुरटी पावडरमध्ये बीट, पालक, मेथी, हळद व चंदन मिसळले तर गुलाबी रंग तयार होतो.
  • पिक्कट पिवळा रंग : झेंडूंच्या फुलांच्या पाकळ्या सावलीत वाळवून व बारीक पूड करून मग, चना पावडरमध्ये मिसळविली तर हा रंग तयार होतो.
  • हिरवा रंग : कडुलिंबाचा पाला, पालक, मेथी, पुदिना यांच्या पानांना सावलीत वाळवून त्याची पावडर तयार करायची. ही पावडर कणीक किंवा तुरटीच्या पावडरमध्ये मिसळली तर हिरवा रंग रयार होतो.
  • लाल रंग : एक किलो मसूर डाळीचे पीठ व बिटाचा ज्सूस हे गरम माण्यात मिसळविले तर लाल गर्द रंग तयार होतो.
  • काळा रंग : आवळे उकळून त्यातील बीज अलग करून त्यांना वाळवा. नंतर पावडर करून तुरटीच्या पावडरमध्ये मिसळविल्यास काळा रंग तयार होईल.
  • केशरी रंग : फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये पळसाच्या फुलांना वाळवून पावडर करून तुरटीच्या पावडरमध्ये मिसळविले तर केशरी रंग तयार होतो.
  • मेहंदी रंग : धन्याची बारीक पूड करून कणीक व तुरटीच्या पावडरमध्ये मिसळली तर मेहंदी रंग तयार होतो.

 

 

Web Title: Make natural colors, enhance the fun of the festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.