विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन ६ आठवड्यांचे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2021 04:06 AM2021-06-23T04:06:42+5:302021-06-23T04:06:42+5:30
नागपूर : राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता याव्या व त्या साेडविण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी ...
नागपूर : राज्यातील आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडता याव्या व त्या साेडविण्याची संधी मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन किमान ६ आठवडे चालविण्यात यावे, अशी मागणी सत्ताधारी मविआचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांनी केली आहे.
याबाबत वंजारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात येऊन १९ महिने पूर्ण झाले आहेत. मात्र काेराेनाच्या प्रकाेपामुळे या काळात विधिमंडळाचे अधिवेशन १५ दिवसांच्यावर चालविता आले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशनही १० दिवसाच्यावर घेता आले नाही. राज्यातील इतिहासात पहिल्यांदाच सभागृहात इतक्या कमी कालावधीचे कामकाज झाले. मविआ सरकारचा बराचसा कालावधी काेराेनाच्या संकटाशी लढण्यात गेला आहे. कोरोनामुळे सर्वच क्षेत्राची अपरिमित हानी झाली आहे. ही भीषण परिस्थिती मांडून ताेडगा काढण्यासाठी पूर्णकालिन अधिवेशनाची गरज आहे.