संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:10 AM2017-08-18T02:10:21+5:302017-08-18T02:10:48+5:30
संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करून वेगळी अनुज्ञेयता करावी, अशी मागणी भाजप शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : संचमान्यतेत विशेष शिक्षकांची वेगळी तरतूद करून वेगळी अनुज्ञेयता करावी, अशी मागणी भाजप शिक्षक सेलच्यावतीने करण्यात आली. ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यासंबंधीच्या मागणीचे निवेदनसुद्धा सादर करण्यात आले.
ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाजप शिक्षक सेलच्या पदाधिकाºयांसोबत शिक्षकांच्या वेगवेगळ्या प्रश्नांवर तासभर चर्चा करून शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची बैठक बोलावून सर्व प्रश्न निकाली काढण्यात येतील तसेच नागपूर व भंडारा जिल्ह्यात शिक्षक समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येईल, असे सांगितले.
सत्र २०१५-२०१६ अन्वये अतिरिक्त ठरलेल्या परीविक्षाधीन शिक्षकाचे (शिक्षण सेवक) वेतन सुरू करून वरिष्ठ व निवड श्रेणी विनाअट सरसकट लागू करावी, संचमान्यतेत ५ वी व ८ वीचे शिक्षक अनुज्ञेय ठरविताना २० विद्यार्थ्यांची अट रद्द करावी. इयत्ता ६ वी ते ८ वीमधील एकूण विद्यार्थी संख्येवर अनुज्ञेय असलेल्या शिक्षकांमध्येच विशेष शिक्षकांना ग्राह्य धरल्यामुळे अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढले आहे. २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार इयत्ता ९ वी व १० वीच्या शिक्षकांचे प्रमाण अनुज्ञेय करण्यात आलेले नाही. एकाच शाळेतील मराठी माध्यम व हिंदी माध्यमची संचमान्यता एकत्र केल्याने अतिरिक्त शिक्षकांचे प्रमाण वाढले. त्यामुळे मराठी व हिंदी माध्यमाची संचमान्यता वेगवेगळी करावी. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाºयांचे १ तारखेला वेतन न होणाºया जिल्ह्यातील अधिकाºयांवर तात्काळ कार्यवाही करावी, आदी मागण्यांचा निवेदनात समावेश होता.
या बैठकीत आ. चरण वाघमारे, आ. अवसरे, आ. बाळा काशीवर, भंडारा न.प. चे अध्यक्ष सुनील मेंढे यांच्यासह भाजप शिक्षक सेलचे संयोजक महाराष्ट्र प्रदेश डॉ. कल्पना पांडे, विदर्भ संयोजक डॉ. उल्हास फडके, विदर्भ सहसंयोजक अनिल शिवणकर, भंडारा जिल्हा संयोजक शशांक चोपकर, सहसंयोजक कैलास कुरंजेकर, मेघश्याम झंझाड तसेच सुनील ठवरे, नरेंद्र्र मुल्काल्वर, यशवंत नानोटकर, घनश्याम तरोने, बोडके, सुरेश बोंदरे, पंकज धार्मिक, प्रदीप बिबटे, ओमकार श्रीखंडे आदी उपस्थित होते.